शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

आंधळगाव जि.प. शाळेत आता कॉन्व्हेंटचे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2016 00:28 IST

जिल्हा परिषद शाळांमधील विद्याथीर् संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. ग्रामीण भागातही इंग्रजी कॉन्व्हेंटचे शिक्षण मिळत नसल्याने पालकांचे मराठी जिल्हा परिषद शाळांकडे दुर्लक्ष होत आहे.

लोकमत शुभवर्तमान : जिल्हा परिषद सदस्य राणी ढेंगे यांचा पुढाकारसंजय मते आंधळगावजिल्हा परिषद शाळांमधील विद्याथीर् संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. ग्रामीण भागातही इंग्रजी कॉन्व्हेंटचे शिक्षण मिळत नसल्याने पालकांचे मराठी जिल्हा परिषद शाळांकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा परिषद शाळांना गतवैभव परत मिळावे यासाठी आंधळगावच्या जिल्हा परिषद सदस्या राणी ढेंगे यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद शाळेत कॉन्व्हेंट सुरु करण्यात आली आहे. या कॉन्व्हेंटमध्ये केवळ १०० रूपयात के.जी. १ आणि के.जी.२ असे वर्ग तयार करण्यात आले आहे.ग्रामीण भागातील गरीब पालक इंग्रजी शाळांचा भरमसाठ खर्च करण्यासाठी सक्षम नसतात. त्यामुळे इच्छा असूनही मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षण देता येत नाही. त्यामुळे नाईलाजाने त्यांना मराठी माध्यमातून शिक्षण घ्यावे लागते. ग्रामीण भागातील पालक हा शेती व्यवसायावर निगडीत असल्याने व परिसरातील इंग्रजी माध्यमाचे फॅड वाढत असताना त्यालाही आपल्या पाल्याला इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये शिकावावे, अशी इच्छा असते. मात्र आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने तो पालक आपल्या मुलांचा शिक्षण मराठी माध्यमातून करतो. याच उदात्त हेतूतून आंधळगाव क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या राणी ढेंगे यांनी गरीब पाल्यांचा विचार करून आंधळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मराठी माध्यमांच्या शाळांमधील घटत्या पटसंख्येच्या परिणामावर तोडगा काढला. जिल्हा परिषद शाळेतच इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटला सुरूवात करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद शाळा समिती पदाधिकाऱ्या समक्ष मांडला. पदाधिकाऱ्यांनी होकार दिला. प्रस्ताव पारित करून भंडारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला. आणि शिक्षण विभागाने या प्रस्तावाला तातडीने मंजुरीही दिली. या प्रस्तावासाठी लोकप्रतिनिधींनीही मोलाचे प्रयत्न केले. अन् राज्यातील या पहिल्या प्रयोगाला शिक्षण विभागाने मान्यता दिली. नुकताच ७० विद्यार्थ्यांना १०० रूपयात प्रवेश देण्यात आला आहे. माझी सेवा ग्रामीण भागातील जनतेसाठी असल्यामुळे त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाकरिता मी कटीबद्ध आहे. मराठी शाळा ओस पडत आहेत. प्रत्येक गावात कॉन्व्हेंटचे फॅड सुरु आहे. इंग्रजी शाळा अतोनात शुल्क आकारत आहे. खासगी वाहनांमधून मुलांना डांबल्यासारखा प्रवास सुरू आहे. जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांविना राहत असल्याने हा इंग्रजी कॉन्व्हेंटचा प्रस्ताव मंजूर करून कमी पैशात शिक्षण देण्याचा प्रयत्न लोकसहभागातून सुरु केला आहे. यामुळे मराठी शाळांना चांगले दिवस येतील, असा विश्वास आहे. - राणी ढेंगे, जिल्हा परिषद सदस्य आंधळगाव