अन् चोरीस गेलेले दागिने वृद्धेला मिळाले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST2019-12-01T06:00:00+5:302019-12-01T06:00:41+5:30

सिहोरा पोलीस ठाण्याअंतर्गत देवसर्रा येथे शांताबाई सदाशिव बिसने (७०) राहतात. २०१७ मध्ये त्या सीतेपार येथील शेतात कामाला गेल्या होत्या. त्यावेळी अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र धारदार वस्तूने कापून लंपास केले होते. त्यावेळी शांताबाईने सिहोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत आरोपीला ताब्यात घेतले.

And the stolen jewelry was returned to the old women | अन् चोरीस गेलेले दागिने वृद्धेला मिळाले परत

अन् चोरीस गेलेले दागिने वृद्धेला मिळाले परत

ठळक मुद्देदेवसर्राची महिला । सिहोरा पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : एकदा चोरीस गेलेले दागिने पुन्हा मिळण्याची कुणालाही आशा नसते. अनेकदा तर पोलिसात तक्रारही केली जात नाही. मात्र सिहोरा पोलिसांनी एका वृद्धेचे चोरीस गेलेले दागिने दोन वर्षानंतर परत मिळाले. पोलिसांच्या ताब्यातील दागिने घेताना वृद्धेच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि पोलिसांप्रती असलेला विश्वास आणखी दृढ झाला.
सिहोरा पोलीस ठाण्याअंतर्गत देवसर्रा येथे शांताबाई सदाशिव बिसने (७०) राहतात. २०१७ मध्ये त्या सीतेपार येथील शेतात कामाला गेल्या होत्या. त्यावेळी अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र धारदार वस्तूने कापून लंपास केले होते. त्यावेळी शांताबाईने सिहोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या मंगळसुत्रातील ८ मणी व १२ गोल मणी जप्त केले. पोलिसांनी सदर प्रकरणी तुमसर न्यायालयाचा आदेश मिळविला. त्यानंतर शांताबाईला पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोषसिंह बिसेन आणि ठाणेदार देवेंद्र ठाकुर यांच्या उपस्थितीत सदर वृद्धेच्या दागिने सुपूर्द करण्यात आले. दोन वर्षापूर्वी चोरीस गेलेले दागिने आपल्याला परत मिळणार नाहीत अशी तिला खात्री होती. परंतु पोलिसांच्या प्रयत्नातून दागिने मिळाले. दागिने स्वीकारताना तिच्या चेहºयावर आनंद ओसंडून वाहत होता. पोलिसांनी मनावर घेतले तर कोणत्याही प्रकरणाचा छडा लावू शकतात हेच यातून सिद्ध झाले.

Web Title: And the stolen jewelry was returned to the old women