शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीत सर्वच उमेदवारांची ‘हवा टाईट’

By admin | Updated: October 9, 2014 22:57 IST

जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रापैकी साकोलीतील निवडणूक काहींना प्रतिष्ठेची, काहींना अस्तित्वाची तर काहींना भूतकाळातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

भंडारा : जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रापैकी साकोलीतील निवडणूक काहींना प्रतिष्ठेची, काहींना अस्तित्वाची तर काहींना भूतकाळातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्षांनी जातीय समिकरणासोबतच महात्मा गांधींजीच्या छायाचित्रांचा आधार घेतला आहे. आजघडीला येथील निवडणूक सर्वच उमेदवारांसाठी प्रचंड तापदायक ठरणारी आहे.साकोली विधानसभा क्षेत्रात कुणबी समाजाचे प्राबल्य असले तरी हा समाज पोटजातीत विखुरला आहे. या समाजातून सर्वाधिक उमेदवारांनी मैदानात उडी घेतली आहे. यात काहींच्या मागे नेते नाहीत तर काहींनी फोडाफोडीच्या राजकारणावर भर देत आहेत. साकोली विधानसभा क्षेत्रात तेली, कुणबी, अनुसूचित जाती, कोहळी, आदिवासी, भोईढिवर, माळी समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे उमेदवारही यावेळी रिंगणात आहेत. त्या-त्या भागात त्यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे मतांचे विभाजन ठरले आहे. याशिवाय पोवार, कलार आणि अल्पसंख्यक समाजाचे प्रतिनिधी रिंगणात नसल्यामुळे प्रमुख उमेदवारांनी या समाजातील प्रत्येक गटांना भेटून मतांचा जोगवा मागत आहेत. प्रत्येकांना स्वत:चा समाज प्रिय असतो. त्यामुळे रिंगणात नसलेल्या समाजाने कुणाला मते द्यायची, हे अद्याप ठरविलेले नाही. परिणामी उमेदवारांची दमछाक होत आहे.रिंगणातील उमेदवार मात्र हा समाज आपल्याकडे आहे, याकडे लक्ष केंद्रीत करीत असला तरी यापूर्वी या ना त्या पदावर असलेल्या या मंडळीने नागरिकांना धुत्कारल्याचा प्रत्यय मतदारांना येत आहे. त्यामुळे कुणी कितीही दावा केला तरी या समाजाच्या मतांचे विभाजन होणार आहे. त्यामुळे आजघडीला कुणाकडे कोण आहेत, हे ठरविणे, चुकीचे ठरणार आहे.स्वयंघोषित नेतेही सरसावलेपाच वर्षातून एकदाच निवडणुका येत असल्यामुळे आपली पोळी शेकून घेण्यासाठी आतापर्यंत कधीही न दिसणारे अनेक स्वयंघोषित नेते साकोली क्षेत्रातील दिग्गज उमेदवारांकडे मान‘धना’साठी हाथ पसरवित आहेत. प्रत्येकचजण मी या गटाचा प्रमुख आहे, माझ्याकडे ईतकी मते आहेत, असे सांगून सकाळीच त्या-त्या उमेदवारांच्या दारावर गर्दी करीत आहेत. परंतु प्रत्यक्षात त्यांच्याकडे किती लोक आहेत, याची खडानखडा माहिती त्या उमेदवारांकडे आहे. परंतु निवडणुकीच्या या रणधुमाळीत कुणाला नाराज करणे परवडणारे नसल्यामुळे ताकावर परत पाठवित आहेत. काहींनी नामांकन दाखल करुन ईकडून तिकडे उड्या मारत असून आतापर्यंत अनेक पक्षात प्रवेश केला आहे. आता मी तुमच्यासोबत आहे, असे सांगत फिरत आहेत. (प्रतिनिधी)