शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आरोपीकरिता पोलिसांना हवा वॉरंट

By admin | Updated: October 2, 2015 05:38 IST

तुमसरातील घरफोडी प्रकरणातील दोन महिला आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पुन्हा त्या आरोपी महिलांनी

तुमसर : तुमसरातील घरफोडी प्रकरणातील दोन महिला आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पुन्हा त्या आरोपी महिलांनी अन्य ठिकाणी केलेल्या चोरीच्या चौकशीसाठी तुमसर पोलिसांनी दिवाणी व फौजदारी न्यायालयात अर्ज करुन ‘प्रोड्यूस वॉरंटची’ मागणी केली आहे.बुधवारी सकाळच्या सुमारास विनोबा भावे मार्गावर दोन महिला संशयास्पद स्थितीत फिरत होत्या. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्या घाबरल्या. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी दुर्गा नगरातील घरफोडी प्रकरणाची कबुली दिली. याप्रकरणी माधुरी गजानन पवार (२८) व शोभा कोचन्ना दांडेकर (२१) रा.हिंगणघाट, जि.वर्धा यांच्याविरुद्ध तुमसर पोलिसांनी भादंवि ४५४, ३८० कलमान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता आरोपी महिलांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शहरात मागील एक महिन्यांपासून घरफोडीचे सत्र सुरु आहे. पोलिसांना आरोपींचा सुगावा लागलेला नाही. बंद घरे फोडण्यात आली. यात काही महिलांचा समावेश असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. प्रत्येक चोरीत साधर्म्य दिसून आल्यामुळे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचा अन्य घटनेत सहभाग असू शकतो कां? याची माहिती जाणून घेण्यासाठी न्यायालयात प्रोड्युस वॉरंटची मागणी केली आहे. आरोपी महिला दगडी पाटे टाचविण्याचे काम करीत असल्याचे भासवित होते. परंतु त्यांचा मुख्य व्यवसाय घरफोडी करणे होते, या निष्कर्षाप्रत तुमसर पोलीस पोहचले आहेत. (तालुका प्रतिनिधी)घरफोडी प्रकरणात न्यायालयात चौकशीसाठी अर्ज केला आहे. आरोपी महिलांकडून अन्य घरफोडीचे धागेदोरे गवसण्याची शक्यता आहे.- सुरेश हावरेतपास अधिकारी, तुमसर.