तुमसर : बिनाखी येथे सर्पदंशाने एका नवविवाहितेचा शुक्रवारी उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सकांनी रुग्णालय अधीक्षिकेसह एका परिचारीकेला सक्तीच्या रजेवर पाठविले. आंदोलनकर्त्यांच्या शांततेनंतर मृतक महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी बिनाखी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी जिल्हा शल्यचिकित्सकांनी आंदोलनकर्त्यांसोबत भंडारा येथे बैठक घेतली.बिनाखी येथील शारदा सेवानंद कटरे (२२) हिला घरीच अंगणात गुरुवारी रात्री सर्पदंश झाला होता. दुसऱ्या दिवशी प्रथम सिहोरा व नंतर उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे तिच्यावर उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा तुमसर येथे मृत्यू झाला. मृत झाल्यावर तिला आॅक्सीजन लावून भंडारा येथे रेफर करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला. उपचारात हयगय तथा मृत झाल्यावर एका तास विलंबनाने माहिती कुटुंबियांना दिली या प्रकरणी रुग्णालयात आंदोलनकर्त्यांनी शुक्रवारी सहा तास आंदोलन केले होते.आंदोलनकर्त्यांची कठोर भूमिकेमुळे रुग्णालय अधिक्षीका डॉ.संध्या डांगे व परिचारिका वालदे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय जिल्हा शल्यचिकित्सकांनी घेतला. येथे दोघांना निलंबित करण्यची मागणी आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. यासंदर्भात शनिवारी येथे आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ व शल्यचिकित्सकांनी भंडारा येथे सामान्य रुग्णालयात बैठक घेतली.सकाळी ९.३० दरम्यान शारदा कटरे हिला तुमसर येथे रुग्णालयात दाखल केल्यानंतर कोणते उपचार करण्यात आले ते कुणी केले, कोणती औषधे देण्यात आली याची संपूर्ण कागदपत्रांची चौकशी करण्यात आली. याचा संपूर्ण अहवाल आरोग्य उपसंचालक नागपूर यांचेकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर कारवाई होईल असे जिल्हा शल्यचिकित्सकांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
आंदोलनकर्ते, जिल्हा शल्यचिकित्सकांची बैठक
By admin | Updated: August 24, 2014 23:18 IST
बिनाखी येथे सर्पदंशाने एका नवविवाहितेचा शुक्रवारी उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सकांनी रुग्णालय अधीक्षिकेसह एका परिचारीकेला
आंदोलनकर्ते, जिल्हा शल्यचिकित्सकांची बैठक
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}