शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळले

By admin | Updated: August 19, 2016 00:33 IST

तीन दिवसांपासून वीज वितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे भारनियमनाविरुद्ध धरणे आंदोलन सुरु होते

सकाळी लोटांगण आंदोलन : प्रकरण भारनियमनाचे साकोली : तीन दिवसांपासून वीज वितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे भारनियमनाविरुद्ध धरणे आंदोलन सुरु होते. मात्र अधिकाऱ्यांनी याची दखल न घेतल्यामुळे या आंदोलनाचे रुपांतर आता आमरण उपोषणात झाले आहे. साकोली तालुक्यातील १६ तासांचे भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कार्यालयासमोर दि. १६ पासून बेमुदत भारनियमन सुरु केले. मात्र या अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आज तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी सकाळी लोटांगण आंदोलन व नंतर गावात मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देऊन धरणे आंदोलनाचे रुपांतर आता आमरण उपोषणात केले आहे. काही काळ तणावाचे वातावरण चिघळले होते. यावेळी अविनाश ब्राम्हणकर, अंताराम खोटेले, राम महाजन, हरिभाऊ खोटेले, रामचंद्र कापगते, दुर्वास कापगते, सुरेशसिंह बघेल, गोवर्धन कापगते, नंदू समरीत, रामदास कापगते, बाबूराव कापगते, प्रकाश शिवणकर, अभिमन चुटे व मारोती कापगते उपस्थित होते. मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या धरणे आंदोलनातून काहीच तोडगा निघाला नाही. म्हणून आज सकाळी शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर लोटांगण आंदोलन केले व अधिकाऱ्यांना कार्यालयात जाण्यासाठी आमच्या अंगावरून जा अशी भूमिका घेतली होती. मात्र वीज कार्यालयातील अधिकाऱ्यांनी यावेळी शेतकऱ्यांना न जुमानता मिळेल त्या ठिकाणाहून जाऊन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले. त्यावेळी काही काळ वातावरण चिघळले होते. नंतर वातावरण शांत झाले. (तालुका प्रतिनिधी)