शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अखेर खुटसावरीत पाणीपुरवठा सुरळीत

By admin | Updated: June 5, 2016 00:24 IST

तालुक्यातील खुटसावरी येथील नळधारकांना पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रात बिघाड आला. त्यामुळे गुरुवारपासून ग्रामस्थांना पाण्यासाठी धावपळ करावी लागली.

दखल लोकमतची : सरपंच, सचिवांनी पाळला शब्दभंडारा : तालुक्यातील खुटसावरी येथील नळधारकांना पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रात बिघाड आला. त्यामुळे गुरुवारपासून ग्रामस्थांना पाण्यासाठी धावपळ करावी लागली. याविषयी 'लोकमतने वृत्त प्रकाशित करताच दुरुस्तीचे काम युध्दस्तरावर करण्यात आले. अखेर शनिवारी खुटसावरीवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यात आला. गुरुवारला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरवेलमध्ये बिघाड आल्यानंतर गावकऱ्यांना पाणीटंचाईचा त्रास होऊ नये, म्हणून सरपंच विजय वासनिक, ग्रामसेवक एस. एस. हातझाडे व नरेंद्र पोटवार यांनी वेळ न दवडता रात्रीला यंत्र तज्ज्ञांची चमूला आणण्यासाठी कसोसीने प्रयत्न केले. यंत्र दुरुस्त करणाऱ्या चमूने रात्री १० वाजतापासून कार्याला सुरुवात केली. बोरवेलमधील पाईप काढण्यासाठी तब्बल आठ तास लागले. ते कार्य पहाटेपर्यंत चालले. रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थ तेथे उपस्थित होते. आज सकाळी नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात आला. पाणीपुरवठा सुरु झाल्यानंतर सरपंच व सचिवांनी शब्द पाळल्याची चर्चा गावात होती. गुरुवारला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरवेलमध्ये बिघाड आला. त्यामुळे गावकऱ्यावंर पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली होती.गावात सुस्थितीत असलेल्या एक-दोन हातपंपावर पाण्यासाठी महिलांची गर्दी वाढली होती. बोअरवेलवरील गर्दी पाहून अनेक नागरीक दोन, तीन किमी अंतरावर असलेल्या शेतातील स्रोतातून बैलबंडीने पाण्याची वाहतूक आज पहाटेपर्यंतही सुरु होती. बोअरवेलमध्ये मोठा बिघाड असल्यामुळे दुरुस्तीसाठी पाच-सहा दिवस लागतील असा अंदाज गावात वर्तविण्यात येत होता. मात्र सरपंच व सचिवांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून बोअरवेल दुरुस्ती करणाऱ्या चमूला विनंती केली. विनंतीवरून इतर कामे बाजूला सारून चमू खुटसावरीत रात्री ९ वाजता दाखल झाली. चमू दाखल होताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. बोअरवेलमध्ये पाईप जीर्ण असल्यामुळे चमूला ते काढण्यासाठी मोठे श्रम गाळावे लागले. (नगर प्रतिनिधी)