शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

५४ दिवसानंतरही विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: August 21, 2016 00:29 IST

विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता वाढावी व त्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नरत आहेत.

सर्व शिक्षा अभियानाचा फज्जा : विद्यार्थी शैक्षणिक सुविधेपासून वंचित, पालकांमध्ये असंतोषविशाल रणदिवे अड्याळ विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता वाढावी व त्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नरत आहेत. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविल्या जाते. मात्र ५४ दिवसाच्या शैक्षणिक सत्रात अड्याळ येथील विद्यार्थी पुस्तकाच्या प्रतिक्षेत असल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे पालकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरविल्या जात आहे. यावर राज्य शासन शिक्षण विभागाच्या माध्यमातून वर्षाला कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे. शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व पाठ्यपुस्तक वितरीत करावे, असे निर्बंध घातले आहे. यासाठी पाठ्यपुस्तक निर्मिती संस्थेकडून उन्हाळ्यातच शिक्षण विभागाला पुस्तकांचे वितरण करण्यात आले. शाळा सुरू होण्यापुर्वी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून संबंधित पंचायत समिती व तिथून शाळांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.पुस्तके मिळाली असली तरी अनेक विषयांचे पुस्तके कमी प्रमाणात पाठविल्याने अनेकांना अद्यापही पुस्तकांचा पुर्ण संग्रह मिळालेला नाही. अनेक विद्यार्थी पुस्तकापासून वंचित असल्याने शैक्षणिक सत्र सुरू होवून तीन महिन्यांचा कालावधी लोटत असतानाही त्यांना शाळेत अन्य विषयाचे अभ्यासक्रम हाताळावे लागत आहे. अनेक शाळांमध्ये पहिल्या सत्रातील चाचण्या सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांकडे पुस्तक उपलब्ध नसल्याने अनेकांची शैक्षणिक बोळवण होत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. याबाबत शिक्षण विभागाला विचारणा केली असता त्यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला माहिती दिली असून त्यांच्याकडून वेळेत पुस्तके उपलब्ध झाली नसल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. शिवसेना तालुका प्रमुख राजु ब्राम्हणकर व ग्रामपंचायत सदस्य महेश गभने यांनी पुस्तकाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शिक्षण विभागाने त्वरीत पुस्तकांचे वाटप करावे, अशी मागणी केली आहे. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी बाजारपेठेत पुस्तकांची पाहणी केली मात्र तिथेही पुस्तक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके पुरविली जातात. दरम्यान अड्याळ येथील सुजाता कन्या विद्यालय, अड्याळ विद्यालय अड्याळ, प्रकाश विद्यालय अड्याळ व विवेकानंद विद्या भवन विद्यालय अड्याळ या चार विद्यालयातील इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळा सुरू होवून तीन महिन्यांचा कालावधी लोटत असतानाही विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतिक्षेत आजही आहेत. संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांना पुस्तके उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले. त्यांच्याकडून मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वळती करण्यात आली. मात्र पुस्तक कधी उपलब्ध होईल, याबाबत कुणीही बोलायला तयार नाही. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधण्यासाठी सर्व शिक्षा अभियान सुरू करण्यात आले. मात्र ५४ दिवसांच्या कालावधीनंतरही पुस्तके अप्राप्त असल्याने यालाच सर्व शिक्षा अभियान म्हणायचे काय? असा संतप्त प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.आमच्याकडे जेवढी पुस्तके पुरविण्यात आली त्या सर्व पुस्तकांचा शाळांना पुरवठा करण्यात आला. अतिरिक्त पुस्तकांची मागणी शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे. -एन. टी. टिचकुले, गटशिक्षणाधिकारी पवनी.पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. परंतु पुस्तकच उपलब्ध झालेले नाही. पुस्तके प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येईल.-के. डी. भुरे, विस्तार अधिकारी, पवनी.शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पुस्तक मिळावी यासाठी वारंवार मागणी करण्यात आली आहे. पुस्तक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.-व्ही. एस. जगनाडे, मुख्याध्यापक विवेकानंद विद्यालय अड्याळ.