अड्याळ-चिचाळ जि.प. क्षेत्रात महिला उमेदवाराची धावपळ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:32 IST2021-01-13T05:32:22+5:302021-01-13T05:32:22+5:30

आगामी होऊ घातलेल्या जि.प.च्या निवडणुकात अड्याळ-चिचाळ मतदारसंघाचा विचार आवर्जून होत आहे. त्यांचे कारणही मजेशीर आहे. राजकीय सारीपाटावर अनेक जण ...

Adyal-Chichal Z.P. The rush of women candidates in the field continues | अड्याळ-चिचाळ जि.प. क्षेत्रात महिला उमेदवाराची धावपळ सुरू

अड्याळ-चिचाळ जि.प. क्षेत्रात महिला उमेदवाराची धावपळ सुरू

आगामी होऊ घातलेल्या जि.प.च्या निवडणुकात अड्याळ-चिचाळ मतदारसंघाचा विचार आवर्जून होत आहे. त्यांचे कारणही मजेशीर आहे. राजकीय सारीपाटावर अनेक जण आपले घोडे धावायला लावणार. मात्र, विजय एकच होईल, तेही तेवढीच खरे आहे. मतदारसंघात अड्याळ, चिचाळ, सौंदळ, खापरी, सावरला, सुरबोडी व चकारा गावात विखुरला आहे. या क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना भाजपा व बिएसपी यांनी कंबर कसली आहे. महिला उमेदवारांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. एकंदरीत अड्याळ-चिचाळ जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, बिएसपी आणि काँग्रेस यांच्यात खरी लढत असून, कवाडे गट आपला पत्ता कुणाच्या हातात देतात, यावर उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.

Web Title: Adyal-Chichal Z.P. The rush of women candidates in the field continues