शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भदंत नागपथ यांचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: September 20, 2016 00:29 IST

भरधाव अज्ञात वाहनाने एका ४५ वर्षीय बौद्ध भिक्खूला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

महामार्गावरील घटना : भंडाऱ्यातच केले अत्यंसंस्कारभंडारा : भरधाव अज्ञात वाहनाने एका ४५ वर्षीय बौद्ध भिक्खूला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास महामार्गावरील सेंटपॉल स्कुलसमोर घडली. भदंत नागपथ (४५) असे मृताचे नाव आहे.रविवारी रात्री भदंत नागपथ हे पायदळ महामार्गाच्या कडेने जात होते. दरम्यान एका अज्ञात वाहनाने त्यांना मागून जोरदार धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह रस्त्यावर पडून होता. त्यावरून अनेक वाहने गेल्यामुळे त्यांच्या मृतदेहाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती गस्तीवर असलेल्या नौशाद खान, वाहतूक पोलीस जांगळे या पोलिसांना कळताच त्यांनी भंडारा पोलिसांना कळविले. सहायक पोलीस निरीक्षक रायपूरकर हे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सामान्य रूग्णालयाशी संपर्क साधून छिन्नविछीन्न पसरलेले तुकडे जमा करून मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयातील शवविच्छेदनगृहात ठेवले. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरूध्द गुन्हा नोंदविला आहे. सोमवारला त्यांचा मृतदेह कुटुंबीयाना सोपविण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर वैनगंगा नदीकाठावर बौद्ध रितीरिवाजाप्रमाणे अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी डॉ. भदंत धम्मदीप महाथेरो, भिक्क्षु नागसेन, विनयबोधी, सुगत गयाकश्यप, भिक्क्षुनी धम्मदिन्ना यांच्यासह बौध्द बांधव उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)बौद्ध धम्माचे होते प्रसारकभदंत नागपथ हे २० वर्षांपासून बौध्द धम्माचा प्रचार व प्रसार करीत होते. तत्पूर्वी ते भंडारा तालुक्यातील खुटसावरी या मुळगावी राहत होते. अरविंद मोडकूजी वासनिक असे त्यांचे पुर्वाश्रमीचे नाव आहे. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली असा आप्त परिवार आहे.