शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील तरूण अपघातात ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 05:00 IST

तुमसर ते रामटेक राज्य मार्गावर उसर्रा पुलाजवळ गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याचे काम खोळंबले आहे. हा रस्ता एकेरी असून, रात्री वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. या रस्त्यावर आतापर्यंत अनेक अपघात झाले असून, काहींचा यात बळी गेला आहे. या रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करावे, यासाठी गावकऱ्यांनी आंदोलनही केले होते. मात्र, रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे किती बळी गेल्यानंतर रस्ता दुरूस्त होणार असा प्रश्न गावकरी करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कउसर्रा : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून गावी जाताना दुचकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात नागपूर जिल्ह्यातील एक तरूण ठार, तर दोन जण जखमी झाले. हा अपघात तुमसर - रामटेक मार्गावरील उसर्रा पुलाजवळ बुधवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडला. उसर्रा पुलाजवळ काम खोळंबल्याने अनेक अपघात होत असून, बुधवारी रात्री पुन्हा एका तरुणाचा बळी गेला.प्रज्वल जालंधर गायकवाड (२५, रा. नयाकुंड, ता. पारशिवणी, जि. नागपूर) असे मृताचे नाव आहे, तर अरविंद अमरदीप गजभिये (२६) आणि श्रावण पुरुषोत्तम गजभिये (१५, दाघे रा. नयाकुंड) अशी जखमींचे नावे आहेत. उसर्रा येथील राहुल बोरकर यांचा विवाह पारसिवणी येथे मंगळवारी पार पडला. बुधवारी रात्री नयाकुंड येथील पाहुणे स्वागत समारंभासाठी आले होते. त्यात प्रज्वल गायकवाड, अरविंद गजभिये, श्रावण गजभिये यांचा समावेश होता. स्वागत समारंभ आटोपून हे तिघेही एका दुचाकीने नयाकुंड येथे रात्री जात होतो. उसर्रा येथील पुलाजवळ एकेरी सिमेंट रस्त्याने जात असताना समोरून आलेल्या वाहनाचा प्रखर प्रकाश दुचाकी चालक प्रज्वलच्या डोळ्यावर पडला. त्यामुळे त्याला पुढचे काहीच दिसले नाही. त्यामुळे दुचाकी एकेरी रस्त्याच्या खाली उतरली. पुन्हा रस्त्यावर येताना दुचाकी स्लीप होऊन तिघेही खाली कोसळले. प्रज्वलला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला, तर अरविंद व श्रावण जखमी झाले. 

आणखी किती बळी जाणार?- तुमसर ते रामटेक राज्य मार्गावर उसर्रा पुलाजवळ गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याचे काम खोळंबले आहे. हा रस्ता एकेरी असून, रात्री वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. या रस्त्यावर आतापर्यंत अनेक अपघात झाले असून, काहींचा यात बळी गेला आहे. या रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करावे, यासाठी गावकऱ्यांनी आंदोलनही केले होते. मात्र, रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे किती बळी गेल्यानंतर रस्ता दुरूस्त होणार असा प्रश्न गावकरी करीत आहेत.

 

टॅग्स :Accidentअपघात