हौसेने ट्रॅक्टर घेतला, पण नशिबाने दिला दगा ! डोक्यावर सात लाख कर्जाचा बोजा; शेतकऱ्याने जीवन संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 19:15 IST2025-10-01T19:14:01+5:302025-10-01T19:15:06+5:30
Bhandara : शेतीच्या उत्पन्नाने दगा दिला. अखेर खचलेल्या ५२ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आयुष्यच संपविले.

A farmer bought a tractor, but fate betrayed him! With a debt of seven lakhs on his head, the farmer ended his life
लोकमत न्यूज नेटवर्क
किटाडी : अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतीला आधार होईल यासाठी कर्जावर ट्रॅक्टर खरेदी केला. मात्र नशिबाने दगा दिला. कर्जाचा डोंगर कमी झालाच नाही. ७ लाख १२ हजार रुपयांचे कर्ज थकले. शेतीच्या उत्पन्नानेही दगा दिला. अखेर खचलेल्या ५२ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आयुष्यच संपविले. ही घटना लाखनी तालुक्यातील किटाडी येथे सोमवारी (दि.२९) रात्री ८:४५ वाजण्याच्या सुमारास घडली. जयदेव मारोती खारकर असे मृताचे नाव आहे.
जयदेव यांच्याकडे दीड एकर कोरडवाहू शेतजमीन होती. त्यांनी एका बँकेमार्फत कर्जावर ट्रॅक्टर खरेदी केला. कर्जाच्या रकमेचा नियमितपणे भरणा होत नसल्याने बँकेचे कर्ज शिल्लक राहिले. अल्प उत्पादन, त्यातच कर्ज; या विवंचनेतून ते नेहमी तणावात राहायचे. उद्विग्न मनःस्थितीतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. रात्री खोलीत संधी साधून मयालीला नायलॉन दोरी बांधून गळफास घेतला. बराच वेळ होऊनही ते बाहेर न आल्याने पत्नी संगीता यांनी डोकावून पाहिले असता मृतदेह दिवसून आला. प्रकरणी पालांदूर पोलिसांनी मर्ग नोंदविला आहे.