शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

साकोली तालुक्यात अतिवृष्टीने तब्बल ९४ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:00 IST

तालुक्यात गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत ९४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. तालुक्यातील ६५२ घरांची पडझड झाली असून ११९५ हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले आहे. शासनाच्या वतीने नुकसानग्रस्तांना तातडीची मदत म्हणून गहू आणि तांदळाचे वितरण करण्यात आले. तर उर्वरीत नुकसान भरपाई शासन नियमानुसार बँक खात्यात जमा होणार आहे.

ठळक मुद्दे६५२ घरांची पडझड : ११९५ हेक्टरवरील पिकांना फटका

संजय साठवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : तालुक्यात गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत ९४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. तालुक्यातील ६५२ घरांची पडझड झाली असून ११९५ हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले आहे. शासनाच्या वतीने नुकसानग्रस्तांना तातडीची मदत म्हणून गहू आणि तांदळाचे वितरण करण्यात आले. तर उर्वरीत नुकसान भरपाई शासन नियमानुसार बँक खात्यात जमा होणार आहे.
साकोली तालुक्यात गुरुवारी अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस साकोली तालुक्यात नोंदविला गेला. या पावसाने सर्वत्र हाहाकार उडाला होता. साकोली तालुक्यासह अनेक गावे जलमय झाली होती. पुराचे पाणी शिरून घर गोठ्यांचे आणि शेतीचेही नुकसान झाले. महसूल विभागाच्या सर्वेक्षणानुसार अंशत: नुकसान झालेल्यांमध्ये सानगडी १४ घरे, वडद १७, साकोली ४५, बांपेवाडा २०, सासरा ५, कुंभली २५, सेंदूरवाफा ७, उमरी २२, चांदोरी १९, बोदरा २६, गडकुंभली ५, जमनापूर ४, शिवणीबांध २२, वडेगाव १०, एकोडी ७८, परसोडी २४, पळसगाव २६, गोंडउमरी १९, मुंडीपार सडक १९, पिंडकेपार ३५, विरसी ३०, किन्ही मोखे ४७ घरांचे नुकसान झाले. तर पूर्णत: नुकसान झालेल्या घरांमध्ये साकोली १२, जमनापूर १, एकोडी ३७, परसोडी ४, पिंडकेपार २ घरांचा समावेश आहे. वडद येथे दोन गोठे, बांपेवाडा येथे ११, सासरा येथे एका गोठ्याचे नुकसान झाले.
साकोली तालुक्यातील किन्ही येथे गावात संपूर्ण पाणी शिरले होते. तर बोदरा येथील तलावाची पाळ फुटल्याने परिसरात पाणी शिरले होते. या पावसामुळे साकोली तालुक्यातील ११९५ हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले घर - गोठे आणि शेतीपिकाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. शासननिर्णयाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येईल. ही सर्व रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
- बाळासाहेब तेडे,
उपविभागीय अधिकारी

टॅग्स :Rainपाऊस