शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नदी काठावरील गावांना आठ कोटींचा निधी मंजूर

By admin | Updated: February 23, 2016 00:19 IST

धापेवाडा उपसा सिंचन योजनेला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाने बाधीत होणाऱ्या वैनगंगा नदी काठालगत शेत शिवारात पुल ..

पुलाचे बांधकाम होणार : जिल्ह्यातील सात गावांचा समावेशरंजित चिंचखेडे  भंडारा धापेवाडा उपसा सिंचन योजनेला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाने बाधीत होणाऱ्या वैनगंगा नदी काठालगत शेत शिवारात पुल आणि रस्ते बांधकामासाठी आठ कोटींचा निधी मंजुर झालेला असून यात गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सात गावांचा समावेश आहे.सिहोरा परिसरातून बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर ४५० कोटी रूपये खर्चून धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणात साठवणूक करण्यात येणाऱ्या पाळ्याचा उपसा गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा सिंचन योजना व अदानी विज प्रकल्प करित आहे. या नदीवर योजना आणि प्रकल्पाचे स्वतंत्र पंपगृह लावण्यात आले आहे. धरणात पाणी अडविण्यात आल्याने वैनगंगा नदी काठालगत असणारे नाले व शेतशिवार तुडूंब पाण्याने भरली आहेत. यामुळे नाल्यात पाणी असल्याने शेतकऱ्यांना शेतशिवारात ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. नाल्यात पाचफुट पेक्षा अधिक पाणी असल्याने शेतकऱ्यांना जिकरीचे ठरत आहे. या पाण्याने बाधीत होणारे सिहोरा परिसरातील चार गावे असून तिरोडा तालुक्यातील तीन गावांचा यात समावेश आहे. या गावात उपसा सिंचन योजना तिरोडा अंतर्गत पुल आणि रस्ते बांधकामाचा सर्वेक्षण करण्यात आलेला आहे. परंतु निधी अभावी गेल्या अनेक वर्षापासून या विकास कामाचे बांधकाम झाले नाही. देवरी देव गावात स्मशानभूमी कडे जाणाऱ्या नाल्यात पाच फुट पाणी असल्याने प्रेत नेताना गावकऱ्यांना सकंटाचा सामना करावा लागत आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा तुरकर यांचे गृहगावात गावकऱ्यांना समस्यांना सामोरे जाण्याची पाळी आल्याने सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य असा प्रवास सुरू असताना त्यांनी सातत्याने पत्र व्यवहारातुन शेतकऱ्यांची समस्या व कैफियत मांडली आहे.दरम्यान शेतकऱ्यांची समस्या सोडविण्यासाठी सिहोरा परिसरातील देवरी देव ते नदीघाट पर्यंत जाणाऱ्या नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी ८ लाख ७४ हजार रूपयांचा निधी मंजुर करण्यात आलेला आहे. या शिवाय देवरी देव ते नर्सरीपर्यंत नाला करिता १ कोटी ६ लाख ४१ हजार रूपये, देवरी देव ते सुकडी नकुल या गावांना जोडणाऱ्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम ६२ लाख ७५ हजार रूपये, चुल्हाड ते नदी घाटपर्यंत पुल व पोच रस्ता ४७ लाख ८६ हजार, माता बम्बलेश्वरी मंदीर शेजारी सुकडी नकुल येथील पुल बांधकाम ३८ लाख ६२ हजार रूपये मंजूर करण्यात आले आहे.