जिल्ह्यात ६६ कोरोनामुक्त, ६२ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 05:00 AM2020-11-25T05:00:00+5:302020-11-25T05:00:12+5:30

भंडारा जिल्ह्यात आढळलेल्या ६२ रुग्णांमध्ये भंडारा तालुक्यात १९, मोहाडी आणि लाखांदूर तालुक्यात प्रत्येकी दोन, पवनी तालुक्यात तीन, साकोली आठ, लाखनी १३ आणि तुमसर तालुक्यातील १५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८३ हजार २२२ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी १० हजार १८० व्यक्ती बाधित आढळून आले. तर ९०९८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या ८३८ व्यक्ती उपचार घेत आहेत.

66 corona free, 62 positive in the district | जिल्ह्यात ६६ कोरोनामुक्त, ६२ पॉझिटिव्ह

जिल्ह्यात ६६ कोरोनामुक्त, ६२ पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देएकाचा मृत्यू : ८३८ रुग्णांवर उपचार सुरु

  लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात मंगळवारी ६६ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. तर ६२ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भंडारा तालुक्यातील एका वृद्ध महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला असून सध्या ८३८ व्यक्ती उपचार घेत आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याचे दिसत आहे.
भंडारा जिल्ह्यात आढळलेल्या ६२ रुग्णांमध्ये भंडारा तालुक्यात १९, मोहाडी आणि लाखांदूर तालुक्यात प्रत्येकी दोन, पवनी तालुक्यात तीन, साकोली आठ, लाखनी १३ आणि तुमसर तालुक्यातील १५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८३ हजार २२२ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी १० हजार १८० व्यक्ती बाधित आढळून आले. तर ९०९८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या ८३८ व्यक्ती उपचार घेत आहेत. मंगळवारी भंडारा तालुक्यातील ६१ वर्षीय महिलेचा कोरोनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्ह्यात मृतांची संख्या आता २४४ झाली आहे. 
सर्वाधिक रुग्ण आतापर्यंत भंडारा तालुक्यात आढळून आले आहे. ४४१८ व्यक्ती बाधित असल्याचे भंडारा तालुक्यात आढळले आहे. मोहाडी तालुक्यात ८३२, तुमसर ९९६, पवनी १११२, लाखनी १०३५, साकोली १२२०, लाखांदूर ५६७ रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेच्यावतीने कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात आहे.

Web Title: 66 corona free, 62 positive in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.