शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
6
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
7
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
8
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
9
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
10
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
11
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
12
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
13
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
14
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
15
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
16
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
17
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
18
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
19
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
20
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
Daily Top 2Weekly Top 5

लाखनी तालुक्यात अतिवृष्टीने ४५२ घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:01 IST

लाखनी तालुक्यात गुरूवारी झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र हाहाकार उडाला होता. लाखनीसह अनेक गावे जलमय झाली होती. अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले. तहसील कार्यालयाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले असून अंशता नुकसान झालेल्या घरांची संख्या ४२५ असून यात ३९ लाख ५० रूपयांचे नुकसान झाले. तर नऊ घरे पूर्णत: बाधित झाली असून त्यात सहा लाख २५ हजार रूपयांचे नुकसान झाले.

ठळक मुद्दे४६ लाखांचे नुकसान : महसूल विभागाचे सर्व्हेक्षण, नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्या

चंदन मोटघरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे तब्बल ४५२ घरांची पडझड झाली असून ४६ लाख ७० हजार रूपयांचे नुकसान झाले. तहसील कार्यालयाच्यावतीने केलेल्या सर्वेक्षणात ही नुकसानीची आकडेवारी पुढे आली आहे.
लाखनी तालुक्यात गुरूवारी झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र हाहाकार उडाला होता. लाखनीसह अनेक गावे जलमय झाली होती. अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले. तहसील कार्यालयाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले असून अंशता नुकसान झालेल्या घरांची संख्या ४२५ असून यात ३९ लाख ५० रूपयांचे नुकसान झाले. तर नऊ घरे पूर्णत: बाधित झाली असून त्यात सहा लाख २५ हजार रूपयांचे नुकसान झाले. तालुक्यात १८ गोट्यांची पडझड होवून ९५ हजार रूपयांचे नुकसान झाले. अतिवृष्टी व पुरामुळे ९४ कुटुंबांचे स्थलांतरण करण्यात आले. कपडे, भांडे व अन्न धान्याचे नुकसान झाले आहे. मात्र जीवितहानी झाली नाही. केवळ एक वासरू पाण्यात वाहून गेले.
तालुक्यात मुरमाडी-सावरी येथील ४० घरात नाल्याच्या पुराचे पाणी शिरले होते. तर रेंगेपार कोठा येथील तलाव ओव्हरफ्लो झाल्याने ३३ घरात पाणी शिरले. तसेच लाखनी, सावरी, सोमलवाडा, मेंढा, केसलवाडा वाघ, गराडा, किन्ही, दैतमांगली, चिखलाबोडी, गोंडसावरी, रेंगेपार कोठा, खेडेपार, लाखोरी, आलेसूर, पिंपळगाव सडक, सामेवाडा, रेंगेपार कोहळी, चिचटोला, सालेभाटा, मासलमेटा, बोरगाव, केसलवाडा पवार, परसोडी, मुंडीपार, सिद्धीपार, मारेगाव, राजेगाव, निलागोंदी, इसापूर, मचारणा, मांगली, रेंगोळा, पोहरा, कनेरी, पेंढरी, चालना, धानला, सिपेवाडा, मानेगाव, मेंढा पोहरा, पालांदूर, मºहेगाव, पाथरी आदी गावात घरांची पडझड झाली आहे. या सर्वांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

२४०० हेक्टर शेती पाण्याखाली
लाखनी तालुक्यात २० व २१ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीने २४०० हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. त्यापैकी ३३ टक्केच्या आतमध्ये १६९६ हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले आहे. भाजीपाला पिकांचे ७३.५० हेक्टर क्षेत्र पुरामुळे बाधित झाले. तालुक्यातील १९९० भात उत्पादक तर १६८ भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

पुराचे पाणी शेतात शिरून पिकांचे नुकसान झाल्यास वयक्तीक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई निश्चित करावी. सदर माहिती संबंधित बँक, विमा कंपनी किंवा कृषी व महसूल विभागात देणे आवश्यक आहे.
- पद्माकर गिदमारे,
तालुका कृषी अधिकारी लाखनी.

टॅग्स :Rainपाऊस