शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांत ४४ टक्के जलसाठा

By admin | Updated: July 28, 2014 23:21 IST

उशिरा का असेना वरूणराजाची कृपादृष्टी भंडारा जिल्ह्यावर बरसली आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांत ४४ टक्के जलसाठा असून यापैकी फक्त एक माजी मालगुजारी तलाव, एक मध्यम

जलसाठा : मामा तलाव, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प तुडूंबभंडारा : उशिरा का असेना वरूणराजाची कृपादृष्टी भंडारा जिल्ह्यावर बरसली आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांत ४४ टक्के जलसाठा असून यापैकी फक्त एक माजी मालगुजारी तलाव, एक मध्यम प्रकल्प तर ३ लघु प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. मध्यम प्रकल्पात पाण्याची सरासरी टक्केवारी ३९.१८ आहे.जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा साठा दिवसेंगणिक वाढत आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पांत सरासरी ४४ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ मागील हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात ३१ टक्क्यांनी घट असल्याचे दिसून येते. मागील वर्षी ही टक्केवारी ७५ इतकी होती.लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे़ सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी २३़७९, बघेडा १००, बेटेकर बोथली ६४.२९ आणि सोरणा जलाशयात उपयुक्त जलसाठा ५२.५६ टक्के आहे़जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ४५.४४ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ४९.५७ टक्के आहे़ जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी. पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कार्तुली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार या प्रकल्पांचा समावेश आहे. गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले आहे. त्यामुळे वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे़ आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यात संततधार पावसामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ झाल्याने पाणी सोडण्यात आले होते. यामुळे वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांना पूर आला होता. सध्या स्थिती आटोक्यात असून हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. परिणामी नदीकाठावरील गावांना धोक्याची पूर्वसूचना देण्यात आली आहे. गोसेखुर्द धरणाचा जलसाठा वाढला असून वाढत्या प्रवाहामुळे धरणाची सर्व ३३ दारे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे सध्यातरी मुबलक जलसाठा आहे. पूर ओसरल्यानंतरही वैनगंगा नदीचा जलस्तरही वाढलेला आहे. (प्रतिनिधी)