शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
5
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
6
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
7
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
8
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
9
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
10
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
11
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
12
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
15
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
16
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
17
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
18
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
19
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
20
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाशी लढण्यासाठी भंडारा पॅरामेडिकलचे ४०० विद्यार्थी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST

कोरोना विषाणू संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले आहे. त्यातून भारत देशही सुटलेला नाही. महाराष्ट्रात या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. या काळात आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार व अन्य विभागातील कर्मचारी अहोरात्र काम करीत आहे. त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाला यादी सुपूर्द : आरोग्य विभागासोबत कामाची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आरोग्य, पोलीस, सफाई कामगार व विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी प्राण पणाला लावून काम करीत आहे. यात सर्वात मोठी भूमिका आरोग्य विभागाची आहे. त्यांच्यावर कामाचा मोठा ताण आहे. अशा कर्मचाऱ्यांना साथ देण्यासाठी भंडारा पॅरामेडिकल कॉलेजचे विद्यार्थी पुढे सरसावले आहे. कॉलेजचे संचालक डॉ. अनिल कुर्वे यांच्या पुढाकारात ४०० विद्यार्थ्यांनी कोरोनाशी लढा देण्याची तयार दर्शविली आहे. या सर्वांची यादी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या सुपूर्द करण्यात आली आहे.
कोरोना विषाणू संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले आहे. त्यातून भारत देशही सुटलेला नाही. महाराष्ट्रात या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. या काळात आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार व अन्य विभागातील कर्मचारी अहोरात्र काम करीत आहे. त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे. आरोग्य विभागात आधीच कर्मचाऱ्यांचा तुटवडा असून अशा परिस्थीतीतही कर्मचारी एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढा देत आहेत.
अशा कर्मचाºयांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाºया कौशल्य विकास योजनेतून पॅरामेडिकल क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेले आणि शिकत असलेले पात्र व्यक्ती महत्वाचे ठरु शकतात. त्यासाठी भंडारा पॅरामेडिकल कॉलेज व तुमसर येथील अनुराधा पॅरामेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कोरोनाशी लढा देण्यासाठी आपली समंती दिली आहे.
अभ्यासक्रम पूर्ण केलेले व सध्या शिकत असलेल्या ४०० विद्यार्थ्यांचे समंती पत्र, विद्यार्थ्यांची नावे, संपर्क क्रमांक जिल्हा शल्य चिकित्सकांकडे देण्यात आले आहे.

भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. मात्र आपतकालीन स्थिती उद्भवल्यास त्यावर मात करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आम्हाला सेवेची संधी द्यावी, विद्यार्थी कोरोनाला हरविल्याशिवाय राहणार नाही.
- डॉ. अनिल कुर्वे,
संचालक, भंडारा पॅरामेडिकल कॉलेज

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या