जिल्ह्यात ४० हजार ८५७ व्यक्ती निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 05:00 AM2020-10-03T05:00:00+5:302020-10-03T05:00:36+5:30

भंडारा जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित झाला तेव्हापासून आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. पहिला रुग्ण २७ एप्रिल रोजी आढळून आला होता. अलिकडे अ‍ॅन्टीजेन टेस्ट कीटद्वारे तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार ५८५ व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ४० हजार ८५७ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आले तर पॉझिटिव्ह आढळून आलेल्या ५७२८ व्यक्तींपैकी ३८०२ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

40 thousand 857 persons in the district are negative | जिल्ह्यात ४० हजार ८५७ व्यक्ती निगेटिव्ह

जिल्ह्यात ४० हजार ८५७ व्यक्ती निगेटिव्ह

Next
ठळक मुद्देरुग्ण बरे होण्याचा दर ६६.३८ टक्के : जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार ५८५ व्यक्तींची तपासणी त्यात ५७२८ पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी ४० हजार ८५७ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार ५८५ व्यक्तींची अ‍ॅन्टीजेन आणि आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. त्यात ५७२८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्यात. तर रुग्ण बरे होण्याचा रेट ६६.३८ टक्के असून मृत्यू दर २.१८ टक्के आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे.
भंडारा जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित झाला तेव्हापासून आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. पहिला रुग्ण २७ एप्रिल रोजी आढळून आला होता. अलिकडे अ‍ॅन्टीजेन टेस्ट कीटद्वारे तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार ५८५ व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ४० हजार ८५७ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आले तर पॉझिटिव्ह आढळून आलेल्या ५७२८ व्यक्तींपैकी ३८०२ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तपासणीच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी असल्याने ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. नागरिकही आता कोरोनाबाबत जागृक झाले असून संसर्ग टाळण्यासाठी स्वत:हून विविध उपाययोजना करताना दिसत आहे. जिल्ह्यातील एक लाख १९ हजार ८८४ नागरिकांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड केला असून त्यामाध्यमातून कोरोनाबाबत इतंभूत माहिती मिळत आहेत. तसेच माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहीमेंतर्गत गावागावात तपासणी मोहीम राबविली जात आहे.

डबलींग रेट २१.५०
जिल्ह्यात कोरोना रुग्ण डबल होण्याच्या रेट २१.५० दिवस आहे. साधारणत: २१ दिवसात जिल्ह्यात रुग्ण दुप्पट होत असल्याचे दिसून आले आहे. इतर जिल्ह्याच्या मानाने हा रेट समाधानकारक आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हा व आरोग्य प्रशासन शर्तीचे प्रयत्न करीत असून त्याचे हे यश मानले जात आहे.

शुक्रवारी १३९ व्यक्ती पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू
जिल्ह्यात शुक्रवारी १३९ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात भंडारा तालुक्यातील ७७, साकोली १५, तुमसर ८, मोहाडी १३, पवनी १७, लाखनी ९ रुग्णांचा समावेश असून लाखांदूर तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. भंडारा तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या आता २९६४ झाली आहे. शुक्रवारी २४ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात भंडारा तालुक्यातील ६० वर्षीय पुरुष आणि पवनी तालुक्यातील ६० वर्षीय महिलेचा शुक्रवारी कोरोनाने मृत्यू झाला.

मृत्यूदर २.१८ टक्के
जिल्ह्यात आतापर्यंत १२६ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला असून मृत्यूदर २.१८ टक्के आहे. मृत्यू दर आटोक्यात असून मृत्यू झालेले बहुतांश रुग्ण हे उशिरा निदान झालेले आहेत. वेळेवर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर बहुतांश व्यक्ती अवघ्या ७२ तासात मृत्यूमुखी पडल्यात. मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

Web Title: 40 thousand 857 persons in the district are negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.