शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

३३ विद्यार्थ्यांच्या शाळा बहिष्काराला अखेर मिळाला न्याय

By admin | Updated: August 26, 2016 00:33 IST

जिल्हा परिषद शाळेत आठव्या वर्गाला मान्यता मिळालीच पाहिजे यासाठी डांबेविरली येथील पालक व गावकऱ्यांनी टोकाची भूमिका घेतली.

पालकांपुढे शिक्षण विभागाचे अधिकारी निरुत्तर : बाळा काशिवारांच्या मध्यस्थीने आज शाळेची घंटा वाजणारलाखांदूर : जिल्हा परिषद शाळेत आठव्या वर्गाला मान्यता मिळालीच पाहिजे यासाठी डांबेविरली येथील पालक व गावकऱ्यांनी टोकाची भूमिका घेतली. अखेर पालकांनी जिल्हा परीषद शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना बैठकीदरम्यान निरुत्तर केल्याने आमदार बाळा काशिवार यांनी मध्यस्थी करून प्रश्न निकाली काढला. त्यामुळे या शाळेची घंटा आता पुन्हा वाजणार आहे.लाखांदूर तालुक्यात कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात पालक व गावकऱ्यांचे आठवीकरिता आंदोलन जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या नाकीनऊ आणणारे ठरले. उशिरा का होईना अखेर आमदार बाळा काशीवार यांनी डांबेविरली येथे बैठक घेऊन प्रश्न निकाली काढला. सत्र सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून आठवीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव मागितले होते. त्यानुसार डांबेविरली येथील शिक्षण समितीने तसा प्रस्ताव सादर करुन जिल्हा परिषदेकडे पाठवला. आज ना उद्या मान्यता येईल म्हणून गावातच आठवी सुरू करण्यात आला. पंचायत समिती शिक्षण विभागाकडून पुस्तकांचे वाटपही करण्यात आले. खासगी शाळा गावातच असल्याने जिल्हा परिषद भंडारा शिक्षण विभागाने आठवा वर्ग बंद करण्याचे पत्र दिल्याने पालकांमध्ये नाराजी पसरली. बुराडे हायस्कुल येथे भौतीक सुविधेचा अभाव, मैदान नाही. शाळेला आवश्यक इमारत नाही, त्यामुळे या शाळेची मान्यता रद्द करून जिल्हा परिषद शाळेला आठवीची मान्यता मिळाली पाहिजे म्हणून हेका धरत १५ दिवसांपासून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे बंद केले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी गुरूवारला आमदार बाळा काशिवार यांनी पालक, गावकरी, जिल्हा परिषद भंडारा शिक्षण विभागाचे अधिकारी, पंचायत समिती शिक्षण विभागाचे अधिकारी यांची डांबेविरली येथे बैठक बोलावून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी गावकऱ्यांनी शिक्षण विभागाचे अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. यापूर्वी या प्रकरणाकडे शिक्षण विभागाचे अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने ते निरुत्तर झाले. हरिदास खोब्रागडे, सरपंच वासुदेव बुराडे, पं.स.सदस्य शिवाजी देशकर यांनी या संपूर्ण प्रकरणात शिक्षण विभागाचे अधिकाऱ्यांनी निष्काळजी केल्याचा पाढा वाचला. बुरडे हायस्कुलचे अध्यक्षांनी न्यायालयात दाद मागितल्याने आता जिल्हा परिषद भंडारा शिक्षण विभाग पालक व गावकऱ्यांची बाजू मांडून न्याय मागणीकरीता न्यायालयात दाद मागणार तसेच आठवीच्या त्या ३३ विद्यार्थ्यांचे प्रवेश लाखांदूर जि.प. हास्यस्कुल येथे करून, ८ कि. मी. चा प्रवास पूर्ण करण्यासाठी आ.काशिवार स्वत: सायकल उपलब्ध करून देणार असल्याचे मान्य केले. त्यामुळे आता शाळेची घंटा पुन्हा वाजणार असून आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु जो पर्यंत जिल्हा परिषद भंडारा शिक्षण विभाग पालकांची मागणी रास्त समजून न्यायालयात दाद मागणार नाही, तो पर्यत विद्यार्थ्याचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र काढणार नसल्याची भूमिका पालकांनी घेतल्याने लवकरात लवकर जिल्हा परिषद भंडारा शिक्षण विभागाने न्यायालयात दाद मागण्याची पूर्व तयारी करण्याचे निर्देश आ. काशिवार यांनी दिले. यावेळी सरपंच वासुदेव बुराडे, जि. प. सदस्य प्रणाली ठाकरे, सभापती मंगला बागमारे, नूतन कांबळे, विनोद ठाकरे, विलास तिघरे, प्रकाश राऊत, पं. स. सदस्य अल्का मेश्राम, शिवाजी देशकर, हरिदास खोब्रागडे, प्रदीप बुराडे, प्रमोद ढोरे, कल्लू रामटेके, दीपक बुराडे, तहसीलदार तोडसांम, खंडाविकास अधिकारी देवरे, तत्वराज अंबादे, शिक्षणाधिकारी स्वर्णलता घोडेस्वार, उपशिक्षणाधिकारी चोले उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)