शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

सर्पमित्रांनी उबविले ३० पानदिवड सापांचे पिल्ले

By admin | Updated: July 26, 2014 01:28 IST

येथील ग्रीनफ्रेन्ड्स नेचर क्लबचा सर्पमित्र पंकज भिवगडे याने

ग्रीनफ्रेण्डसचा पुढाकार : भंडारा - गोंदिया जिल्ह्यात प्रथमच कृत्रिमरीत्या साप अंडे उबविण्याचा प्रयोगलाखनी : येथील ग्रीनफ्रेन्ड्स नेचर क्लबचा सर्पमित्र पंकज भिवगडे याने घरासमोरील असलेल्या नालीतून दोन महिन्यापूर्वी एका पाणदिवड सापाला (चेकर्ड किल बँक वॉटर स्नेक) पकडून बरणीमध्ये ठेवले होते. साप गर्भार असल्याचे लक्षात येताच सपंमित्रानी कृत्रिमरित्या पिल्ले उबविण्याचा निर्णय घेतला. या सापाने बरणीमध्येच प्रथम ३० अंडी नंतर १० असे ४० अंडी दिले. तीन वर्षांपूर्वी असा प्रयोग अयशस्वी झाल्यामुळे या सर्पमित्रांनी काळजीपूर्वक अंडे उबविण्याचे ठरविले. याकरिता ग्रीनफ्रेन्ड्स नेचर क्लबचे संघटक प्रा.अशोक गायधने यांनी मार्गदर्शन केले. सापाच्या अंडे उबविण्याचा कालावधी ५५ ते ६७ दिवसाचा असल्याने प्रखर उन्हात ते टिकणे शक्य नव्हते. त्यामुळे पंकज भिवगडे, गगन पाल व मयूर गायधने यांनी बरणीतील सापाला व अंड्यांना कोणताही धक्का लागणार नाही, अशारितीने बाहेर काढले. अंड्यांना बाहेर काढून बरणीमध्ये थंड माती - रेती ठेवली व पुन्हा अंड्यातील द्रव न हलविता ते थंड माती रेती मिश्रणावर ठेवले. बरणीतील वातावरण ३० अंश सेल्सीअसच्या वर जाणार नाही, याची काळजी घेतली. अखेर ६२ व्या दिवशी एकेक पाणदिवडचे पिल्लू बाहेर पडणे सुरु झाले व दोन दिवसात ३० अंड्यातून पिल्ले बाहेर पडून बरणीमध्ये हालचाल करायला लागले. तेव्हा सर्पमित्रांना परिश्रमाचे चीज झाल्याचे वाटले. कृत्रिमरित्या पाणदिवड सापाचे अंडे उबविण्याचा भंडारा - गोंदिया जिल्ह्यातील हा पहिलाच यशस्वी प्रयोग आहे. सर्व पिल्लांना सोडण्यात आले.ही कामगिरी सर्पमित्र पंकज भिवगडे, गगन पाल, मयूर गायधने, आरिफ बेग, सचिन सार्वे व अश्पाक शेख यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)