शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

मोफत प्रवेशासाठी 2600 अर्ज; 767 जणांनाच लागणार ‘लॉटरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 05:00 IST

आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२-२३ या वर्षाकरीता गत महिन्याभरापासून प्रवेश प्रक्रिया सुरु झाली हाेती. जिल्ह्याभरातून पालकांनी ऑनलाईन पध्दतीने कागदपत्रांची पुर्तता करीत अर्ज दाखल केले आहे. विशेष म्हणजे या वर्षी काही नियमात बदलही झाला आहे. जन्मतारीखसह अन्य बाबींची काटेकाेर पडताळणी केली जाणार असल्याचे समजते. त्याअंतर्गत मेरीट यादी जाहिर करुन लाॅटरी पध्दतीने जिल्ह्याभरातील या जागा भरण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : आरटीई अंतर्गत इयत्ता पहिलीच्या माेफत प्रवेशासाठी १० मार्च राेजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण २ हजार ६०३ अर्ज आले आहेत. जिल्ह्यात ९१ शाळांमधून ७६७ विद्यार्थ्यांना माेफत प्रवेशासाठी लाॅटरी लागणार आहे.आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२-२३ या वर्षाकरीता गत महिन्याभरापासून प्रवेश प्रक्रिया सुरु झाली हाेती. जिल्ह्याभरातून पालकांनी ऑनलाईन पध्दतीने कागदपत्रांची पुर्तता करीत अर्ज दाखल केले आहे. विशेष म्हणजे या वर्षी काही नियमात बदलही झाला आहे. जन्मतारीखसह अन्य बाबींची काटेकाेर पडताळणी केली जाणार असल्याचे समजते. त्याअंतर्गत मेरीट यादी जाहिर करुन लाॅटरी पध्दतीने जिल्ह्याभरातील या जागा भरण्यात येणार आहे. जागेपेक्षा चारपट जास्त अर्ज दाखल झाल्याने कुणाला ही लाॅटरी लागते हे लवकरच समजेल.

२५ टक्के जागा राखीव- आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२- २३ या वर्षाकरिता भंडारा जिल्ह्यातील ९१ शाळांमधून ७६७ जागा भरल्या जाणार आहेत.- आरटीई अंतर्गत या शाळांमध्ये असलेल्या एकूण जागांपैकी २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येत असते. याअंतर्गत पालकांनी आपल्या पाल्यांचे अर्ज सादर केले आहेत.

 या कागदपत्रांची  आवश्यकता ऑनलाईन अर्ज दाखल करीत असताना पाल्याचा जन्मदाखला, ३ किमीपेक्षा जास्त अंतरावर शाळा निवडत असताना क्रमांक देणे आवश्यक आहे. यासह गॅसबुक, पासबुक जाेडणे बंधनकारक आहे.

लाॅटरी पध्दतीने जागा भरणारआरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रियेला फेब्रुवारी महिन्यापासूच प्रांरभ झाला हाेता. २५ टक्के राखीव जागांतर्गत पालकांना या संदर्भात लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले हाेते. त्या अंतर्गत गुरुवार १० मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने २ हजार ६०३ अर्ज प्राप्त झाले आहेत. आता लाॅटरी पध्दतीने जिल्ह्याभरातील या जागा भरल्या जाणार आहेत. प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने राबविली जात आहे. आहे.- मनाेहर बारस्कर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) भंडारा

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र