शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

२४ उमेदवारांनी खर्च सादर केलाच नाही

By admin | Updated: November 26, 2015 00:41 IST

नगरपंचायत निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने निवडणूक खर्च ३० दिवसांच्या आंत सादर करणे बंधनकारक ...

शिवसेना, भाजप उमेदवारांचाही समावेश मोहाडी : नगरपंचायत निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने निवडणूक खर्च ३० दिवसांच्या आंत सादर करणे बंधनकारक असताना सुद्धा मोहाडी येथील पराभूत २४ उमेदवारांनी अद्यापपर्यंत निवडणूक खर्च सादर केलेला नाही. यात शिवसेना, भाजप सारख्या पक्षाचे उमेदवार सुद्धा आहेत.राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येकच उमेदवाराला ३० दिवसाच्या आत निवडणूक खर्च संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सादर न करणाऱ्या उमेदवाराला सदस्यत्व रद्द तसेच सहा वर्षापर्यंत निवडणूक लढविण्यावर निर्बंध घालण्याचा प्रावधान आहे. निवडणूक खर्च सादर न करणाऱ्यामध्ये अ‍ॅड. नंदकिशोर गायधने, भाजपाचे माजी ग्रामपंचायत सदस्य रफीक सैय्यद, भाजपाच्याच संगीता युवराज बारई, राष्ट्रवादीचे माजी ग्रामपंचायत सदस्य ओमकार पवारे हे प्रमुख उमेदवार आहेत. अ‍ॅड. नंदकिशोर गायधने यांना या निवडणुकीत शुन्य मते मिळाली होती हे उल्लेखनिय. याशिवाय रविंद्र उदाराम थोटे, ममता महिपाल बावणे यांना सुद्धा शुन्य मते प्राप्त झाली होती तर राजा प्रभाकरराव रणदिवे यांना फक्त एकच मत प्राप्त झाले होते.अपक्ष १२, शिवसेना ६, मनसे २, भाजपाचे २, राष्ट्रवादीचे २ अशा २४ उमेदवारांनी २५ नोव्हेंबर पर्यंत निवडणूक खर्च सादर केलेला नव्हता. त्यांना निवडणूक आयोगातर्फे दोनदा नोटीसीही पाठविण्यात आल्या होत्या. त्या २४ उमेदवारांनी खर्च सादर करण्याची तहदीक घेतली नाही. आता खर्च सादर करण्यासाठी फक्त सहा दिवस उरलेले असून जर एखाद्याने खर्च सादर करण्यात दिरंगाई केली तर त्याच्यावर सहा वर्षापर्यंत निवडणूक लढविण्यावर बंदी घातली जाणार हे निश्चित आहे. या उमेदवारांवर कोणती कारपाई होईल, याकडे अनेकांचे लक्ष आहे. (शहर प्रतिनिधी)