शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत 235 तर पंचायत समितीत 407 उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 05:00 IST

भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ गणांसाठी निवडणूक घाेषित झाली हाेती. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन जिल्हा परिषदेच्या १३ आणि पंचायत समितीच्या २५ गणातील निवडणूक स्थगित करण्यात आली. त्यामुळे आता ३९ गटात निवडणूक हाेत आहे. सात तालुक्यातून २३५ उमेदवार रिंगणात आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अनिश्चिततेच्या सावटात सुरु असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ६४२ उमेदवार रिंगणात असून त्यात जिल्हा परिषदेच्या ३९ गटात २३५ तर पंचायत समितीच्या ७९ गणात ४०७ उमेदवार रिंगणात आहे. प्रचाराला प्रारंभ झाला असला तरी बुधवारी ओबीसी आरक्षणावरुन न्यायालयात काय निर्णय लागताे, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ गणांसाठी निवडणूक घाेषित झाली हाेती. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन जिल्हा परिषदेच्या १३ आणि पंचायत समितीच्या २५ गणातील निवडणूक स्थगित करण्यात आली. त्यामुळे आता ३९ गटात निवडणूक हाेत आहे. सात तालुक्यातून २३५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात तुमसर तालुक्यातील ३९, माेहाडी २३, साकाेली २६, लाखनी १०, भंडारा ७४, पवनी २३ आणि लाखांदूर तालुक्यातील ४० उमेदवारांचा समावेश आहे. तर पंचायत समितीच्या निवडणूकीत तुमसर तालुक्यात ६९, माेहाडी ५०, साकाेली ४२, लाखनी ४४, भंडारा १०३, पवनी ५५ आणि लाखांदूर तालुक्यातील गणांमध्ये ४४ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या २३५ उमेदवारांमध्ये १३६ पुरुष तर १९९ महिला उमेदवार आहेत.२१ डिसेंबर राेजी मतदान हाेणार असून सर्व उमेदवार प्रचाराला लागले आहे. मात्र अद्यापही निवडणूकीवर अनिश्चिततेचे सावट आहे. निवडणूक हाेणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे. 

ओबीसी आरक्षण प्रकरणात निकालाची उत्सुकता- ओबीसी प्रवर्गातील गट आणि गणातील निवडणूक स्थगित केल्यानंतर या विराेधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. याप्रकरणात १३ डिसेंबरला निकाल अपेक्षीत हाेता. पंरतु सुनावणी एक दिवसाने पुढे ढकलली. मंगळवारी सुध्दा सुनावणी पूर्ण हाेवू शकली नाही. त्यामुळे आता बुधवारी यावर निकाल अपेक्षीत आहे. न्यायालयाचा निकाल काय लागताे याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

प्रचाराचा नारळ फुटला- जिल्ह्यातील ३९ गट आणि ७९ गणातील निवडणूकीसाठी उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फाेडला आहे. आपल्या नेत्यांच्या मार्गदर्शनात उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. विकासाचा नारा देत उमेदवारांनी रणधुमाळी सुरु केली आहे. लवकरच या निवडणूकीचे वातावरण तापणार आहे. मात्र सर्वांना न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा आहे.

ओबीसींच्या भुमिकेकडे लक्ष- आरक्षण नाही तर मतदान नाही अशी भुमिका जिल्ह्यातील ओबीसी संघटनांनी घेतली आहे. आम्हाला मत मागायला येवू नका असे फलकही अनेकांनी घरावर लावले आहे. निवडणूकीच्या प्रचाराला प्रारंभ झाला असून उमेदवार सावध भुमिका घेत प्रचार करीत आहे. आता न्यायालयाचा निकाल काय येताे आणि ओबीसी संघटना काय भुमिका घेतात याकडे लक्ष आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूक