शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय तपासणीसाठी २२५ तरुण पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2016 00:50 IST

भंडाऱ्यात पहिल्यांदाच आयोजित खुली सैनिक भरती वैद्यकीय तपासणीसाठी २२५ तरुण पात्र ठरले.

भंडाऱ्यात सैनिक भरतीचा पहिला दिवस : आज यवतमाळ जिल्ह्यातील तरुणांची चाचणीभंडारा : भंडाऱ्यात पहिल्यांदाच आयोजित खुली सैनिक भरती वैद्यकीय तपासणीसाठी २२५ तरुण पात्र ठरले. विशेष म्हणजे नोंदणीपेक्षा निम्मे उमेदवार सैनिक भरतीसाठी शहरात दाखल झाले. सैन्य भरतीसाठी बुधवारी वर्धा जिल्ह्यातील नोंदणीकृत उमेदवार पहाटे ३ वाजतापासूनच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात उपस्थित झाले होते. आज पहाटे ५ वाजता प्रथम उमेदवाराची चाचपणी करण्यात आली. यानंतर सकाळी ९ वाजतापर्यंत जवळपास वर्धा जिल्ह्यातून ४ हजार ४६५ नोंदणीकृत उमेदवारांपैकी जवळपास १६५० उमेदवारांनी हजेरी लावली. यात दुपार सत्रापर्यंत सर्व उमेदवारांची शारीरिक चाचणी व कागदपत्रे तपासण्याचे कार्य पूर्ण करण्यात आले होते. चाचणीअंती एकुण उमेदवारांपैकी २२५ उमेदवार गुरुवारी होणाऱ्या वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरल्याची कर्नल एम.के. जोशी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ७ जानेवारीला यवतमाळ जिल्ह्यातील तर ८ ला भंडारा जिल्ह्यातील उमेदवार सैन्य भरतीसाठी उपस्थित राहणार आहेत. यासाठी तरुणांचे जत्थे शहरात ठिकठिकाणी दिसू लागले आहेत. (प्रतिनिधी) जमिनीवरच तरुणांनी घेतला आश्रयसैन्य भरतीसाठी विदर्भातील जिल्ह्यांमधून दररोज तरुणांचे जत्थे शहरात दाखल होणार आहेत. विविध जिल्ह्यातून आलेल्या तरुण उमेदवारांसाठी शहरातील पाच ठिकाणी निवाऱ्याची सोय केली आहे. परंतु या ठिकाणी फक्त खोली असून सुविधा नाहीत. त्यामुळे तरुणांना आसरा घेण्यासाठी जागा मिळाली. परंतु बोचऱ्या थंडीत बसस्थानकातील जमिनीवरच आसरा घ्यावा लागला. शहरातील अन्य दोन ठिकाणी रात्री ११ वाजतापर्यंत संबंधित ठिकाणी कुलूपबंदच होते. संपर्क साधल्यावर ही सभागृहे उमेदवारांसाठी खुली करण्यात आली. बाहेर जिल्ह्यातून आलेल्या या तरुण उमेदवारांना जेवणासाठी सामाजिक संस्था सरसावल्या आहेत.