शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

एसटीतील १७८ जणांनी पगारवाढ स्वीकारली; १२५६ जणांनी नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2021 4:09 PM

भंडारा विभागातील १७८ जणांनी पगारवाढ स्वीकारली असून ते कामावर हजर आहेत. तर १२६५ कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

ठळक मुद्देसंपावर कर्मचारी ठाम केवळ साकोली आगारातून निघतात दिवसाला दोन फेऱ्या

भंडारा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटायचे नाव घेत नाही. शहरी आणि ग्रामीण प्रवासी यामुळे त्रस्त झाले आहेत. अशातच शासनाने वेतनवाढ घोषित केली, तरी कर्मचारी मात्र संपावर कायम आहेत. भंडारा विभागातील १७८ जणांनी पगारवाढ स्वीकारली असून ते कामावर हजर आहेत. तर १२६५ कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

भंडारा विभागात भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, तिरोडा, पवनी या सहा आगारांचा समावेश आहे. आगार स्तरावर चालक, वाहक, तांत्रिक आणि प्रशासकीय असे १४४३ कर्मचारी कार्यरत आहेत. महिनाभरापासून कर्मचारी संपावर कायम आहेत. त्यापैकी १७८ कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदविला नाही. परंतु, या तुटपुंज्या कर्मचाऱ्यांवर बससेवा सुरू करणे अडचणीचे जात आहे. गत तीन दिवसांपासून केवळ साकोली आगारातून दोन बसफेऱ्या भंडारासाठी निघत आहेत. इतर आगाराच्या बसेस ठप्प आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना बाहेरगावी जाताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

१९८ कर्मचारी निलंबित

भंडारा विभागातील १९८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले तर रोजंदारी ८६ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती केली आहे.

खासगी गाड्यांची सवय झाली

महिनाभरापासून एसटीचा संप आहे. बाहेरगावी जायचे म्हटले तर मोठा प्रश्न आहे. परंतु आता खासगी गाड्या मिळतात. दोन पैसे जास्त द्यावे लागत आहेत. परंतु, आता खासगी गाड्यांशिवाय पर्याय नाही. महामंडळाने तत्काळ संप मागे घ्यावा. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. खासगी वाहनात अपघाताची भीती कायम असते. संप कधी मिटणार हा प्रश्न आहे.

-महेश कुंभारे, प्रवासी

एसटी सेवा बंद असल्याने आमचा शेतमाल शहरापर्यंत नेणे अडचणीचे जात आहे. अनेकदा शेतात पिकलेला भाजीपाला आम्ही बसद्वारे भंडारापर्यंत पाठवित होतो. आता खासगी वाहनात भाजीपाला पाठवावा लागतो. परंतु खासगी वाहनधारक पैसेही अधिक घेतात आणि अनेकदा नकार देतात. एसटीचा संप लवकर मिटल्यास सर्वांना दिलासा मिळेल.

-धनराज कायते, टेकेपार

प्रवाशांची आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आता सामोपचाराची भूमिका घ्यायला हवी. महिनाभरापासून बससेवा बंद आहे. महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. आधीच घाट्यात असलेली एसटी यामुळे आणखी रसातळाला जाईल. कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी कामावर हजर व्हावे. आपल्या न्याय हक्कासाठी लढा दिलाच पाहिजे. परंतु प्रवाशांची गैरसोयही टाळणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

-डाॅ.चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक नियंत्रक

टॅग्स :ST Strikeएसटी संपagitationआंदोलनEmployeeकर्मचारीstate transportएसटीStrikeसंप