१५ कोरोनामुक्त, १० नव्या रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST2021-02-05T08:39:51+5:302021-02-05T08:39:51+5:30

शनिवारी ६७४ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात भंडारा तालुक्यात ४, मोहाडी २, तुमसर २, साकोली ...

15 corona free, 10 new patients added | १५ कोरोनामुक्त, १० नव्या रुग्णांची भर

१५ कोरोनामुक्त, १० नव्या रुग्णांची भर

शनिवारी ६७४ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात भंडारा तालुक्यात ४, मोहाडी २, तुमसर २, साकोली १ आणि लाखांदूरमध्ये १ असे १० रुग्ण आढळून आले आहेत. पवनी आणि लाखनी तालुक्यात शनिवारी एकही रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १८ हजार ४१४ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी १३ हजार २१४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले असून १२ हजार ७१३ व्यक्तींनी यशस्वी मात केली आहे.

शनिवारी तुमसर तालुक्यातील एका ५२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला असुन आता मृतांची संख्या ३२१ झाली आहे. सध्या १८० व्यक्ती कोरोना उपचार घेत आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचे दिलासादायक चित्र जानेवारी महिन्यात दिसून आले.

Web Title: 15 corona free, 10 new patients added