शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
4
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
5
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
6
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
7
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
8
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
9
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
10
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
11
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
12
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
13
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
14
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
15
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
16
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
17
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
18
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
19
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
20
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Daily Top 2Weekly Top 5

१२ कुटुंबीयांना घरे सोडण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2016 00:24 IST

वैनगंगा नदी काठ व घरांचे अंतर केवळ एका फुटापेक्षाही कमी आहे. भूस्खलन होऊन मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे.

तहसीलदारांचे निर्देश : पावसाळ्यात कुठे राहायचे, ग्रामस्थांचा सवालतुमसर : वैनगंगा नदी काठ व घरांचे अंतर केवळ एका फुटापेक्षाही कमी आहे. भूस्खलन होऊन मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. पावसाळा सुरु झाल्याने या घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. तुमसर तहसीलदारांनी १२ कुटुंबांना घरे सोडण्याचे निर्देश दिले आहे. दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबांनी कुठे जावे असा प्रश्न उपस्थित होत आहे.वैनगंगा नदी काठावर रेंगेपार येथे १२ घरे अगदी नदी पात्रात समावेश होण्याइतपत भयानक स्थिती येऊन ठेवली आहे. सन २००७ पासून या कुटुंबाने घरे बांधून देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. परंतु हेतुपुरस्पर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. नदी काठापर्यंत ही घरे येऊन टेकली आहेत, तरी शासनाने नियोजन केले नाही. शासनाने या कुटूंबाना गावाशेजारी भूखंड दिले, परंतु दारिद्र्यरेषेखालील जिवन जगणाऱ्या कुटुंबाजवळ पैसा नाही. घरे कशी बांधावी असा प्रश्न या कुटुंबांना पडला आहे.१६ जून रोजी तुमसरचे तहसीलदारांनी रेंगेपार येथील नैतराम दमाहे, कंटीराम नागपूरे, हंसराज माहुले, रामभाऊ नागपूरे, गुलाब कावळे, ब्रिजलाल मोरांडे, बाबु मोरांडे, आनंदराव सोनवाने, अशोक उके, अंबर शेंडे, कला शेंडे, इंजीनबाई भुरे यांना पत्राद्वारे घरे सोडण्याचे निर्देश दिले आहे. सन २००७ मध्ये मोठे तीव्र आंदोलन येथे ग्रामस्थांनी केले होते. रास्ता रोको, जलसमाधी घेण्याचा इशारा शासनाला दिला होता, परंतु काहीच हालचाली झाल्या नाहीत. या घरासमोरुन डांबरीकरणाचा रस्ता जातो, बाजूला जि. प. ची शाळा आहे. त्यामुळे त्यांनाही मोठा धोका आहे.रेंगेपार येथे वैनगंगेचे विस्तृत पात्र आहे. दरवर्शी नदी गावाच्या दिशेने झपाट्याने येत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेती नदी पात्रात गिळंकृत झाली आहे. लोकप्रतिनिधीनी आतापर्यंत केवळ आश्वासने दिली. येथे प्रत्यक्ष जीव जाण्याची पाळी आली तरी काहीच कारवाई झाली नाही. तहसिलदारांनी केवळ आपले कर्तव्य पार पाडले. लोकप्रतिनिधी येथे आपले कर्तव्य केव्हा पार पाडतील असा प्रश्न ग्रामस्थानी विचारला आहे. (तालुका प्रतिनिधी)