शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर उलटून ११ मजूर जखमी

By admin | Updated: May 31, 2016 00:40 IST

देव्हाडा नरसिंगटोला येथील तलाव खोलीकरण व ट्रॅक्टरने गाळ वाहतुकीच्या कामावरील मजूर मातीने भरलेल्या ट्रॅक्टरवर बसून घराकडे जात असताना...

देव्हाडा येथील घटना : काही जखमींना भंडारा तर गंभीर जखमींना नागपूरला हलविलेतुमसर / करडी : देव्हाडा नरसिंगटोला येथील तलाव खोलीकरण व ट्रॅक्टरने गाळ वाहतुकीच्या कामावरील मजूर मातीने भरलेल्या ट्रॅक्टरवर बसून घराकडे जात असताना ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने ११ जण जखमी झाले. सदर घटना आज सोमवारला दुपारी ११ वाजतादरम्यान वैनगंगा साखर कारखान्यासमोरील चढावावर घडली. सर्व जखमींना ग्रामपंचायतीने स्वत:च्या खर्चाने दवाखान्यात हलविण्यात आले. यातील दोन गंभीर जखमींना नागपूरला हलविण्यात आले.मोहाडी तालुक्यातील देव्हाडा / नरसिंगटोला येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोहयो अंतर्गत तलावाचे खोलीकरण व ट्रॅक्टरने गाळ वाहतुकीचे काम हाती घेण्यात आले. कामांवर नरसिंगटोला येथील मजूर कार्यरत आहेत. खोलीकरणातील माती आठवडी बाजारातील खड्डे बुजविण्यासाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहतूक करण्यात येत आहे. सकाळी ७ वाजता कामावर येणाऱ्या मजुरांना दुपारी ११ वाजता जेवणाची सुटी दिली जाते. दि. ३० मे रोजी दुपारी हौशीलाल सुखलाल लाळे रा.नरसिंगटोला यांच्या ट्रॅक्टरची शेवटची ट्रीप असल्याने मजूर घरी जाण्यासाठी उशिर होऊ नये यासाठी माती भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर बसले. वैनगंगा साखर कारखान्यासमोरील चढ भागाावर येताच ट्रॅक्टर ट्रॉलीसह उलटला. यात ट्रॅक्टरखाली दाबल्या गेल्याने ११ मजूर जखमी झाले. यात १० स्त्रिया तर १ पुरुषाचा समावेश आहे. घटनेची माहिती होताच ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी घटानस्थळी पोहचले. जखमींना ग्रामपंचायतीने स्वखर्चातून वाहनांद्वारे दवाखान्यात हलविण्यात आले. जखमींपैकी ६ तुमसर, ३ भंडारा तर दोघींच्या हाता-पायाला व डोळ्याला गंभीर इजा असल्याने जोखम राहू नये यासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी / वार्ताहर)