Vastu Tips: २०२६ मध्ये नशीब सोन्यासारखं चमकेल, फक्त कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर करा 'हा' छोटा बदल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 15:10 IST2026-01-01T15:08:23+5:302026-01-01T15:10:49+5:30
New Year 2026 Vastu Tips: नवीन वर्षाच्या सुरुवातीला या दिनदर्शिकेच्या उपायाचा अनेकांना चमत्कारिक अनुभव आला आहे, आता तुमची पाळी; पण उपाय का? ते पाहू.

Vastu Tips: २०२६ मध्ये नशीब सोन्यासारखं चमकेल, फक्त कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर करा 'हा' छोटा बदल!
नवीन वर्ष सुरू झाले की, आपण घरात नवीन दिनदर्शिका (Calendar) लावतो. ही दिनदर्शिका केवळ तारखा पाहण्याचे साधन नसून, ती आपल्या वेळेचे आणि भविष्याचे नियोजन करते. वास्तू अभ्यासक शामली गोवाडकर यांनी २०२६ हे वर्ष सुख, शांती आणि ऐश्वर्याने भरलेले जावे, यासाठी एक अत्यंत साधा पण चमत्कारीक उपाय सांगितला आहे.
काय आहे हा विशेष उपाय?
हा उपाय नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी किंवा पहिल्या आठवड्यात करणे अत्यंत शुभ मानले जाते.
१. हळदीचा टिळा:
दिनदर्शिकेच्या (कॅलेंडरच्या) प्रत्येक पानावर (जानेवारी ते डिसेंबर) वरच्या बाजूला किंवा एका कोपऱ्यात हळदीचा टिळा लावावा.
महत्त्व: हळद हे मांगल्याचे, शुद्धतेचे आणि गुरु ग्रहाचे प्रतीक आहे. हळदीचा वापर केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि शुभ कार्यात येणारे अडथळे दूर होतात.
२. '५२०' (520) हा अंक लिहा:
हळदीचा टिळा लावल्यानंतर त्याच्या शेजारी किंवा खाली '५२०' हा अंक लिहावा.
महत्त्व: अंकशास्त्रात (Numerology) '५२०' हा एक 'एंजल नंबर' मानला जातो, जो अकल्पित धनलाभ (Unexpected Money) आणि नवीन संधी आकर्षित करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतो.
या उपायाचे फायदे
आर्थिक स्थैर्य: ५२० या अंकाच्या ऊर्जेमुळे पैशाच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतात.
कौटुंबिक सुख-शांती: हळदीच्या वापरामुळे घरात सकारात्मक लहरी पसरतात, ज्यामुळे घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि ऋणानुबंध वाढतो.
समाधान आणि ऐश्वर्य: हा उपाय केल्याने वर्षभर मनाला प्रसन्नता लाभते आणि कामात यश मिळाल्याने समाधान मिळते.
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
हा उपाय करताना घ्यायची काळजी
हा उपाय करताना मन शांत आणि सकारात्मक ठेवावे.
शक्य असल्यास सकाळी स्नान केल्यानंतर देवासमोर बसून श्रद्धेने हे अंक आणि टिळा लावावा.
अनेकांना या उपायाचा चांगला अनुभव आला असून, वास्तूशास्त्राच्या नियमानुसार अंकांची आणि रंगांची ऊर्जा आपल्या प्रगतीला वेग देते.