Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 15:49 IST2026-04-09T15:47:29+5:302026-04-09T15:49:25+5:30

Vastu Shastra: चुकीच्या दिशेला लावलेले पितरांचे फोटो कुटुंबियांच्या प्रगतीत अडथळा ठरू शकतात; याबाबत वास्तूशास्त्रात केलेला इशारा वेळीच लक्षात घ्या. 

Vastu Tips: Beware! If the photos of ancestors are in 'this' direction, money will not stay in the house; Change it on time! | Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!

Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!

आपल्या भारतीय संस्कृतीत पूर्वज किंवा पितरांना देवाचा दर्जा दिला जातो. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण घरात त्यांचे फोटो लावतो. पण, वास्तुशास्त्रानुसार (Vastu Shastra) हे फोटो चुकीच्या दिशेला लावणे तुमच्यासाठी 'आर्थिक विवंचना' आणि 'घरातील अशांततेचे' कारण ठरू शकते.

हे ही वाचा: Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!

अनेकदा आपण घरात सर्व काही नीट असूनही पैशांची चणचण जाणवते किंवा विनाकारण कटकटी होतात. वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये पूर्वजांच्या फोटोंची दिशा चुकीची असल्यास तिथली सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पितरांचे फोटो लावताना खालील नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे:

१. 'ही' आहे योग्य दिशा 

वास्तुशास्त्रानुसार, पूर्वजांचे फोटो नेहमी दक्षिण (South) दिशेच्या भिंतीवर लावावेत. असे केल्याने फोटोचे तोंड उत्तर दिशेकडे राहते. दक्षिण ही पितरांची दिशा मानली जाते. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील अडथळे दूर होतात.

२. चुकूनही 'येथे' फोटो लावू नका 

देवघर (Puja Room): पूर्वज आदरणीय आहेत, पण ते देव नाहीत. त्यामुळे देवांच्या फोटोंसोबत किंवा देवघरात पितरांचे फोटो कधीही लावू नका. यामुळे वास्तूदोष निर्माण होऊ शकतो.

ईशान्य कोपरा (North-East): ही दिशा देवांची मानली जाते. येथे पितरांचे फोटो लावल्याने घरातील प्रगती थांबते.

बेडरूम आणि किचन: स्वयंपाकघर आणि शयनकक्षात पूर्वजांचे फोटो लावणे टाळावे. यामुळे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर आणि मानसिक शांतीवर परिणाम होतो.

हे ही वाचा: Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!

३. लटकते फोटो टाळा

वास्तुशास्त्रानुसार, पूर्वजांचे फोटो कधीही भिंतीवर लटकवू नयेत (Hanging). त्याऐवजी ते लाकडी स्टँडवर किंवा कपाटावर अशा प्रकारे ठेवा की त्याचा आधार मजबूत असेल.

४. फोटोंची संख्या आणि स्थिती

एकाच पूर्वजाचे अनेक फोटो घरात लावू नका.

फोटो कधीही घराच्या मध्यभागी (ब्रह्मस्थान) लावू नका, अन्यथा सुख-समृद्धीला ओहोटी लागते.

फोटोवर धूळ साचू देऊ नका आणि फोटोची फ्रेम तुटलेली नाही याची काळजी घ्या. 

हे ही वाचा : Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!

चुकीच्या दिशेचा परिणाम काय होतो?

जर पूर्वजांचे फोटो पश्चिम किंवा उत्तर दिशेला असतील, तर घरात आर्थिक नुकसान, कामात अडथळे आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता असते. अकारण कलह, अनारोग्य, दुर्धर आजार या गोष्टी घडतात पण कारण समजत नाही. यासाठी वास्तू शास्त्रानुसार पितरांच्या फोटोसंबंधित दिलेले बदल करा आणि वास्तू दोष टाळा. 

Web Title : वास्तु टिप्स: आर्थिक समस्याओं से बचने के लिए पूर्वजों की तस्वीरें सही दिशा में लगाएं।

Web Summary : पूर्वजों की तस्वीरों को गलत दिशा में लगाने से आर्थिक तंगी और अशांति हो सकती है। वास्तु शास्त्र दक्षिण दीवार की सिफारिश करता है। पूजा कक्ष, ईशान कोण, शयनकक्ष और रसोई से बचें। लटकती तस्वीरों को हतोत्साहित किया जाता है। समृद्धि और शांति के लिए इन दिशानिर्देशों का पालन करें।

Web Title : Vastu Tips: Place Ancestor Photos Correctly to Avoid Financial Problems.

Web Summary : Placing ancestor photos incorrectly can cause financial strain and unrest. Vastu Shastra recommends the south wall. Avoid puja rooms, northeast corners, bedrooms, and kitchens. Hanging photos are discouraged. Follow these guidelines for prosperity and peace.