आज २१ मार्च २०२६, मत्स्य जयंती(Matsya Jayanti 2026) भगवान विष्णूंचा हा पहिला अवतार 'जल' तत्त्वाशी संबंधित आहे. वास्तू शास्त्रानुसार, घरामध्ये जल तत्त्वाचे संतुलन असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अशा वेळी मत्स्य जयंतीचे औचित्य साधून घरामध्ये 'मत्स्य मूर्ती' (माशाची प्रतिमा किंवा मूर्ती) आणणे हे केवळ धार्मिक दृष्टीनेच नाही, तर वास्तू शास्त्राच्या दृष्टीनेही अत्यंत लाभदायी ठरते. जाणून घेऊया लाभ.
मत्स्य जयंती २०२६: विनाशाकडून नवनिर्मितीकडे नेणारा विष्णूंचा पहिला अवतार; जाणून घ्या पूजा विधी
मासा हा मांगल्याचे, प्रगतीचे आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. प्रलय काळात ज्याप्रमाणे मत्स्य अवताराने सृष्टीचे रक्षण केले, त्याचप्रमाणे वास्तूमध्ये माशाची उपस्थिती घरातील संकटांचे निवारण करते.
१. वास्तू दोषांचे निवारणवास्तू शास्त्रानुसार, जर घराच्या उत्तर (North) किंवा ईशान्य (North-East) कोपऱ्यात काही दोष असेल, तर तिथे माशाची मूर्ती ठेवणे गुणकारी ठरते. मासा हा सतत गतिशील असतो, त्यामुळे तो घरातील साचलेली नकारात्मक ऊर्जा (Stagnant Energy) बाहेर काढण्यास मदत करतो.
२. आर्थिक समृद्धीचा मार्गमासा हा 'लक्ष्मी' देवीशी संबंधित मानला जातो. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे. या दिशेला पितळ, चांदी किंवा स्फटिकाचा (Crystal) मासा ठेवल्याने घरामध्ये पैशाचा ओघ वाढतो आणि अडकलेली कामे मार्गी लागतात.
स्वामी समर्थ प्रकट दिन २०२६: तुमच्यावर स्वामींची कृपा झाली आहे का? ओळखा 'या' ५ अदृश्य खुणा!
३. शैक्षणिक आणि बौद्धिक प्रगतीमत्स्य अवताराने वेदांचे (ज्ञानाचे) रक्षण केले होते. त्यामुळे मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत किंवा टेबलावर माशाची प्रतिमा किंवा लहान मूर्ती ठेवल्याने त्यांची एकाग्रता वाढते आणि बुद्धी तल्लख होते.
४. मानसिक शांतता आणि थंडावामासा जल तत्त्वाचे प्रतिनिधित्व करतो. घरामध्ये माशाची मूर्ती असल्यास घरातील वातावरण शांत राहते. सदस्यांमधील चिडचिड कमी होऊन एक प्रकारचा मानसिक शांतता जाणवते.
तुम्ही हे ५ आशीर्वाद तुमच्या मुलांना रोज देता का? नाही? मग आजपासूनच करा सुरुवात!
Web Summary : Matsya Jayanti 2026: Placing a fish statue at home balances 'Jal Tattva', removes Vastu defects, brings financial prosperity, enhances concentration for students, and promotes peace, reducing stress and discord among family members, as per Vastu Shastra.
Web Summary : मत्स्य जयंती 2026: घर में मछली की मूर्ति रखने से 'जल तत्त्व' संतुलित होता है, वास्तु दोष दूर होते हैं, आर्थिक समृद्धि आती है, छात्रों के लिए एकाग्रता बढ़ती है और शांति को बढ़ावा मिलता है, जिससे परिवार के सदस्यों के बीच तनाव और कलह कम होती है।