Vastu Tip: घरासमोर चिंचेचे झाड अशुभ मानतात, पण खिशात चिंचेच्या बिया ठेवल्याने उजळतं नशीब?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 12:51 IST2026-02-26T12:50:29+5:302026-02-26T12:51:31+5:30

Vastu Shastra: चिंचेचा वापर आपण जेवणाची चव वाढवण्यासाठी करतो, पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार चिंचेमध्ये तुमचे भाग्य उजळण्याचीही ताकद आहे. 

Vastu Tip: A tamarind tree in front of the house is considered inauspicious, but does keeping tamarind seeds in your pocket bring good luck? | Vastu Tip: घरासमोर चिंचेचे झाड अशुभ मानतात, पण खिशात चिंचेच्या बिया ठेवल्याने उजळतं नशीब?

Vastu Tip: घरासमोर चिंचेचे झाड अशुभ मानतात, पण खिशात चिंचेच्या बिया ठेवल्याने उजळतं नशीब?

चिंचेचा वापर आपण सहसा जेवणाची चव वाढवण्यासाठी करतो, पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार चिंच तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करून यशाचे मार्ग मोकळे करण्यासाठीही अत्यंत प्रभावी मानली जाते. या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया चिंचेचे काही सोपे आणि चमत्कारिक उपाय!

आमलकी एकादशी २०२६: 'या' ७ राशींना होणार धनलाभ, तर ५ राशींना सावधतेचा इशारा!

वास्तुशास्त्रात काही अशा वनस्पती आणि वस्तूंचा उल्लेख आहे ज्या घरातील ऊर्जा बदलण्याची क्षमता ठेवतात. चिंच ही त्यापैकीच एक आहे. जर तुमच्या प्रगतीत अडथळे येत असतील किंवा घरात सतत भांडणे होत असतील, तर चिंचेचे हे तोडगे तुम्हाला मदत करू शकतात.

१. कामातील अडथळे दूर करण्यासाठी

जर तुमचे एखादे महत्त्वाचे काम बराच काळ रखडले असेल, तर चिंचेच्या झाडाची एक छोटी फांदी घरी आणा. ती फांदी स्वच्छ करून आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा अभ्यासाच्या टेबलाखाली ठेवा. असे मानले जाते की, यामुळे कामात येणारे अडथळे दूर होतात आणि एकाग्रता वाढते.

२. नकारात्मक ऊर्जा आणि नजर दोषापासून मुक्ती

घरातील कोणी सदस्य दृष्टावले असेल किंवा सतत आजारपण येत असेल, तर चिंचेचे थोडे दाणे (बिया) घ्या. ते त्या व्यक्तीच्या डोक्यावरून सात वेळा ओवाळून (Clocwise) घराबाहेर एखाद्या निर्जन ठिकाणी फेकून द्या. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो.

आमलकी एकादशी २०२६: आर्थिक चणचण पाचवीला पुजलीये? २७ फेब्रुवारी रोजी करा आवळ्याचा 'हा' उपाय!

३. आर्थिक टंचाईवर उपाय

जर पैसा येत असूनही टिकत नसेल, तर शनिवारी चिंचेच्या झाडाला थोडे पाणी आणि कच्चे दूध अर्पण करावे. यामुळे शनी देवाचा आशीर्वाद मिळतो आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते, अशी धार्मिक मान्यता आहे.

४. मानसिक शांतता आणि ताणतणाव कमी करण्यासाठी

ज्या व्यक्तींना खूप मानसिक ताण जाणवतो, त्यांनी चिंचेच्या बिया एका पांढऱ्या कपड्यात बांधून उशीखाली ठेवून झोपावे. हा उपाय केल्याने झोप चांगली लागते आणि मनातील भीती किंवा अस्वस्थता दूर होण्यास मदत होते.

Palmistry: फक्त नशीबवान लोकांच्याच मनगटावर असते 'ही' चौथी रेघ; दर्शवते अफाट प्रसिद्धी आणि अमाप संपत्ती!

५. व्यवसायात वृद्धीसाठी

तुमच्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये ग्राहकांची गर्दी वाढवण्यासाठी चिंचेची चार पाने एका लाल कापडात बांधून मुख्य प्रवेशद्वाराला लावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि व्यवसायातील मंदी दूर होते.

महत्त्वाची टीप:

वास्तुशास्त्रानुसार चिंचेचे मोठे झाड घराच्या अगदी समोर असणे शुभ मानले जात नाही, कारण त्याची सावली घरासाठी जड असू शकते. मात्र, वरीलप्रमाणे त्याचे छोटे उपाय किंवा फांदीचा वापर करणे अत्यंत लाभदायक ठरते.

टीप: सदर माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित असून अधिक महितीसाठी तज्ञांचा सल्ला उपयुक्त ठरेल!

Ritual: शनिवारी काळा रंग परिधान केल्याने जीवनातील संकटे खरोखर दूर होतात का? काय सांगते शास्त्र?

Web Title : इमली: अशुभ पेड़, भाग्यशाली बीज? समृद्धि के लिए वास्तु टिप्स।

Web Summary : इमली, हालांकि इसका पेड़ अशुभ माना जाता है, वास्तु महत्व रखता है। इसके बीज रखने से भाग्य आता है। यह बाधाओं को दूर करता है, नकारात्मक ऊर्जा को कम करता है, वित्त में सुधार करता है और तनाव कम करता है। व्यवसाय में इमली की पत्तियों का उपयोग ग्राहकों को आकर्षित करता है।

Web Title : Tamarind: Inauspicious tree, lucky seeds? Vastu tips for prosperity.

Web Summary : Tamarind, though its tree is considered inauspicious, holds vastu significance. Keeping its seeds brings luck. It removes obstacles, reduces negative energy, improves finances and reduces stress. Using tamarind leaves in business attracts customers.