Vastu Shastra: घरातले बाथरूम रोगराईला आणि वास्तुदोषाला कारणीभूत तर होत नाहीये ना? 'अशी' घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 02:53 PM2023-04-08T14:53:03+5:302023-04-08T14:55:09+5:30

Vastu Tips: तुमच्या बाथरूममध्ये पुढील गोष्टींचा अभाव वास्तुदोषाला कारणीभूत होऊ शकतो, सविस्तर वाचा!

Vastu Shastra: Doesn't the bathroom in the house cause disease and Vastu Dosha? Take care of 'such'! | Vastu Shastra: घरातले बाथरूम रोगराईला आणि वास्तुदोषाला कारणीभूत तर होत नाहीये ना? 'अशी' घ्या काळजी!

Vastu Shastra: घरातले बाथरूम रोगराईला आणि वास्तुदोषाला कारणीभूत तर होत नाहीये ना? 'अशी' घ्या काळजी!

googlenewsNext

घराच्या वास्तुदोषाचे कारण केवळ दिशा किंवा तिथे ठेवलेल्या वस्तू नसून काही सवयी देखील आहेत ज्या तुम्ही अंगीकारत आहात. अनेकदा आपण अनावधानाने अशा काही गोष्टी करतो ज्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते.  त्या गोष्टी वास्तू दोष आणि आर्थिक अडचणीला कारणीभूत ठरू शकतात.  अशाच सवयींपैकी एक सवय निगडित आहे आपल्या अंघोळीशी! 

>> अंघोळ केल्यावर आपण स्वच्छ होतो, तेवढीच स्वच्छता वास्तूमध्ये ठेवावी असे वास्तू शास्त्र सांगते. वास्तूशास्त्रानुसार, आपले न्हाणी घर अर्थात बाथरूम स्वच्छ ठेवले नाही तर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. रोगराई वाढते. आजार होतात आणि आर्थिक स्थिती ढासळू लागते. यासाठी कोणत्या सवयी अंगिकारायला हव्यात ते जाणून घ्या!

>> अनेकांना अशी सवय असते अंघोळ झाल्यावर कपडे बाथरूमच्या फरशीवर टाकून ठेवतात किंवा एखाद्या बादलीत ओले कपडे ठेवून देतात. त्यामुळे कपड्यांना कुबट वास येतो, कपडे खराब होतात आणि त्यामुळे बाथरूम अस्वच्छ राहण्याला हातभार लागतो. तो गलिच्छपणा टाळण्यासाठी आपले अंतर्वस्त्र अंघोळीआधी धुवून टाकावे व अन्य कपडे ओले न करता एका बादलीत ठेवून मग धुवायला टाकावेत. 

>> बाथरूममध्ये गुंतूळ जमा करून ठेवू नये. ते दिसायला खराब दिसतात आणि त्यावर साबणाच्या पाण्याचे थर किंवा फेस साचून फरशी गुळगुळीत बनते. यासाठी वेळोवेळी बाथरूम स्वच्छ ठेवायला हवे हवे. गुंतूळ केराच्या टोपलीत टाकून द्यायला हवेत. 

>> बाथरूममध्ये शोभेसाठी रोपटी, वेली लावल्या असतील तर त्याची योग्य निगा राखा. त्यात अळ्या, किडे यांचा प्रादुर्भाव होणार नाही ना, याची दक्षता घ्या. 

>> नॅपकिन तसेच टॉवेल यांच्या स्वछ्तेचीही काळजी घ्या. त्याचा संपर्क थेट नाकातोंडाशी येत असल्याने अस्वच्छ टॉवेलमुळे रोगराई होऊ शकते. टॉवेल इतकेच सुती पायपुसणेदेखील महत्त्वाचे आहे. त्यावर पाय स्वच्छ पुसले असता ओल्या पायाचा चिखल, डाग घरात येणार नाही. 

>> बाथरूम मध्ये आरसा लावलेला असेल तर तो सुस्थितीत आहे ना याची काळजी घ्या. तो पडणार नाही अशा जागी ठेवा भेग पडलेला आरसा वापरू  नका. 

Web Title: Vastu Shastra: Doesn't the bathroom in the house cause disease and Vastu Dosha? Take care of 'such'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.