शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

Tarot card: कसा जाईल श्रावण मास, त्यासाठी मनोमन निवडा तीनपैकी एक कार्ड खास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 08:08 IST

Tarot Card: टॅरो कार्ड रिडींगच्या माध्यमातून आपण साप्ताहिक भविष्य जाणून घेतो, त्यासाठी वरीलपैकी एक कार्ड निवडून त्याचे फळ जाणून घ्या!

>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे 

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन20 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट===============

नंबर 1:

हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. महत्त्वाचे बदल घडण्याची शक्यता आहे. जर आत्ता तुम्ही काहीसे निराश किंवा हताश असाल, कुठल्यातरी गोष्टीमुळे खचला असाल किंवा काहीतरी मनाप्रमाणे घडत नाहीये याचा त्रास होत असेल तर या आठवड्यात ही परिस्थिती नक्कीच सुधारणार आहे. तुम्हाला सकारात्मक बदल बघायला मिळतील. तुमच्या हाताबाहेर असलेल्या गोष्टी किंवा माणसं अनुकूल होतील. अडकलेली कामे मार्गी लागण्याचा संभव आहे. काही गोष्टींना गती मिळेल, योग्य दिशा मिळेल. सुधारणा होईल. नशिबाची चांगली साथ मिळेल.

या आठवड्यात तुम्ही प्रामाणिक कष्ट करण्याची गरज आहे. सगळं काही दुसऱ्यांवर किंवा बाहेरच्या परिस्थितीवर ढकलून तुम्ही मोकळं होऊ शकत नाही. जबाबदारी घ्या. आत्ता तुम्ही चांगल्या परिस्थितीत असाल आणि आनंद उपभोगत असाल तर हीच वेळ आहे दुसऱ्याला आनंद देण्याची, त्यांना मनापासून मदत करण्याची. निसर्गचक्र लक्षात ठेवा, आज जर तुम्ही वरच्या बाजूला असाल तर नंतर कधीतरी खालच्या बाजूला येऊ शकता. त्यामुळे वर असाल तर त्याचा अभिमान न ठेवता सत्कर्म करा, अतिशय सतर्क रहा, चुकूनही कोणाला दुखवू नका.

नंबर 2:

हा सप्ताह तुमच्यासाठी संसाधनांच प्राधान्य घेऊन येत आहे. तुम्ही वस्तू, पैसे, लोक, कौशल्य यांनी युक्त असाल. असे प्रसंग किंवा अशा घटना घडतील ज्यात तुम्हाला तुमच्याकडील वस्तुंचा उपयोग करून प्रश्न सोडवावा लागेल. महत्वाची देवाणघेवाण घडू शकते. कामामध्ये किंवा व्यवसायामध्ये लोकांकडून चांगला अभिप्राय मिळू शकतो.  वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाल. अडकलेले पैसे काही प्रमाणात सुटू शकतात. कामामध्ये भरभराट होऊ शकते. एक टप्पा गाठला जाऊ शकतो. घराबाबत किंवा जमिनीबाबत, तुम्हाला चांगलं वाटेल अशी काही घटना घडेल.

या आठवड्यात तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवायचं आहे. योग्य तेवढा आणि योग्य तिथेच पैसे द्या. तुमच्याकडे असलेल्या वस्तूंचा अतिशय चोख पद्धतीने वापर करा. कुठल्या एकाच गोष्टीचा अतिवापर करू नका. कुठली दुसरी गोष्ट तशीच पडून पडून वाया घालवू नका. सगळ्या वस्तू त्यांच्या क्षमतेप्रमाणे वापरा. आर्थिक नियोजन नीट करा. कुठे आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर करू शकता. लोकांना मदत करा, विशेष करून आर्थिक किंवा भौतिक मदत करा. सगळ्यांचा सांभाळ करा. भावनिक न होता, व्यावहारिक वागा, पण तुटक वागू नका.

नंबर 3:

हा सप्ताह तुमच्यासाठी पेलायला जरा अवघड असणार आहे. घर असो किंवा ऑफिस, काहीसं तणावपूर्ण वातावरण असेल. मार्ग पटकन सापडणार नाहीत, उत्तरं मिळणार नाहीत. संवाद नीट होणार नाहीत. गैरसमज निर्माण होतील. बरीच जबाबदारी अंगावर पडेल, त्यामुळे कदाचित मान वर करायला ही वेळ मिळणार नाही. पण चांगली गोष्ट अशी की तुम्हाला त्रास देणाऱ्या काही गोष्टी, किंवा तुमच्या मना विरुद्ध होत असलेल्या काही गोष्टी आता संपणार आहेत, संपायला आल्या आहेत. एक कडू शेवट होऊन, त्यापुढे एक सक्षम सुरुवात होणार आहे.

या आठवड्यात तुम्ही तुमच्या विचारांना आळा घालण्याची गरज आहे. नकारात्मक विचार पूर्णपणे झटकून टाका. परिस्थतीशी फार झगडायला जाऊ नका. तुमच्या हातात फक्त स्वतःला सावरण्याचीच सूत्र आहेत. लोकांशी बोलताना नम्रपणे आणि कमीपणा घेऊन बोललात तर त्रास कमी होईल. आत्ता तुमचे वर्चस्व दाखवण्याची वेळ नाही. थोडे धडपडलात तरी फार खचून जाऊ नका. थोडी विश्रांती घ्या. मान, पाठ, कंबर आणि डोकं हे काही दुखेल असं मुद्दाम वागू नका. झोप पूर्ण घ्या, रात्रीचे वाद आणि चर्चा टाळा. सहनशक्ती वाढवा.

श्रीस्वामी समर्थ.

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलAstrologyफलज्योतिष