शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

वेडसर दिसणाऱ्या माणसाकडून स्वामी विवेकानंदांना मिळाला तणाव नियंत्रणाचा धडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 4:38 PM

देहाला झालेल्या जखमा भरून निघतीलही परंतु मनाला झालेल्या जखमांवर कोणते मलम लावावे, वाचा...

सद्यस्थितीत सभोवताली घडणाऱ्या घटना मन विचलित करणाऱ्या आहेत. अशा वातावरणात मन शांत ठेवायचे असेल, तर समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेले 'मनाचे श्लोक' यांचे नित्यपठण करायला हवे. मनावर नियंत्रण मिळवले, की देहाला झालेल्या वेदना मनावर विपरित परिणाम घडवू शकत नाहीत. देहाला झालेले कष्ट, हाल, निंदा, वेदना या क्षणिक आहेत. त्या जखमा भरून निघतीलही, परंतु मनाच्या जखमा दीर्घकाळ टिकतात. यासाठीच, मनाला देहापासून अपिप्त ठेवावे, असे समर्थ रामदास स्वामी सुचवतात. देही असोनि विदेही राहणे, ही अवस्था कशी असते, हे श्लोकातून आणि स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगातून जाणून घेऊया.

मना मानसी दु:ख आणू नको रे,मना सर्वथा शोक चिंता नको रे,विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी,विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी।

परमपूज्य रामकृष्ण परमहंसांशी भेट होण्यापूर्वी स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातील घटना...नरेंद्र एका प्रापंचिक चिंतेने हैराण होऊन शोकाकूल अवस्थेमध्ये रस्त्यातून एकटाच फिरत होता. कितीही नाही म्हटले, तरी परमार्थच करायचा हा निश्चय ठाम असताना अजून `सद्गुरु' न मिळाल्याने प्रापंचिक देहबुद्धी दु:ख देतच होती. इतक्यात एक विचित्र दृष्य त्यांच्या नजरेस पडले. वेडसर दिसणारा एक माणूस रस्त्यातून हातवारे करत चालला होता. इतक्यात काही टवाळखोर पोरांनी त्याला दगड मारण्यास सुरुवात केली. मुलांच्या दगड मारण्याने तो विक्षिप्त माणूस आनंदाने अधिकच चेकाळत होता.आता तर अतिमाराने त्याच्या अंगामधून रक्ताच्या धारा सुरू झाल्या. जोराजोराने धावत तो माणूस गावाबाहेर जाऊन एका झाडाखाली बसला. त्याची दयनीय अवस्था नरेंद्रला बघवेना. त्याच्याजवळ जाऊन त्याच्या जखमांवर ममतेने हात फिरवून नरेंद्रने त्याला विचारले. `बाबा, फार लागले का? त्या वात्रट मुलांनी तुम्हाला बराच त्रास दिला. तुमच्या देहाला बऱ्याच जखमा झाल्या आहेत. मी वनस्पतीचा रस काढून लावतो.'

त्यावर खदाखदा हसत तो माणूस म्हणाला, `कोण मुलं? कुठला देह? त्या भगवंताच्या लीलेने मी तर पार मोहून गेलो आहे. आनंदून गेलो आहे. किती सुंदर रीतीने भगवंत माझ्याशी दगडाचा खेळ खेळत होता. खूप मजा आली. हाहाहाहा.

त्याच्या या वागण्या बोलण्यावरून नरेंद्रच्या लक्षात आले, देहबुद्धीचे भान हरपलेला, विचार विकारांपासून दूर गेलेला, विदेही अवस्थेमध्ये असलेला जीव वेडा नसून ज्ञानी आहे. उन्मनी अवस्थेतील अनुपम सुख भोगीत आहे. विवेकबुद्धीने मुक्त होण्याचे जीवनातील त्याचे ध्येय निश्चित झाले आहे. मनाला शोक, चिंता, दु:ख हे देहबुद्धी प्रबळ असल्याने होते. विवेकाने विदेही अवस्था प्राप्त होते व जीव मुक्त होतो. 

आपल्यालाही विदेही अवस्था प्राप्त करण्याचा सराव करायला हवा. तो कसा करायचा? तर त्यावर सोपा उपाय म्हणजे, दिवस चांगले असोत की वाईट, मनाला एकच सूचना द्यायची, 'हे ही दिवस जातील.' मग आपोआप विदेही अवस्थेकडे वाटचाल सुरु होईल. 

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य