Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 18:19 IST2025-08-16T17:02:37+5:302025-08-16T18:19:22+5:30
Last Shravan Somvar 2025 Rituals: १८ ऑगस्ट रोजी शेवटचा श्रावणी सोमवार आहे, त्यानिमित्त इच्छापूर्तीसाठी महादेवाच्या उपासनेत दिलेला उपाय करायला विसरू नका.

Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
महादेवाला भोळा सांब म्हटले जाते तसेच आशुतोष हेही त्याचे नाव आहे. जो मनापासून केलेल्या उपासनेने लवकर संतुष्ट होतो, तो आशुतोष! अशा या देवाधिदेवाचा महिना श्रावण आणि आता उरलाय त्याचा शेवटचा आठवडा. १८ ऑगस्ट रोजी या वर्षातला शेवटचा श्रावणी सोमवार(Last Shravan Somvar 2025) असणार आहे. त्यानिमित्ताने इच्छापूर्तीसाठी ज्योतिष अभ्यासक शिरीष कुलकर्णी यांनी सांगितलेला उपाय चुकवू नका.
महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. महादेवाच्या मंदिरात सकारात्मक ऊर्जा असते. तिचा अनुभव तिथे गेल्याशिवाय घेता येणार नाही. शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने त्या दिवशी मंदिरात बरीच गर्दी असू शकेल. त्यामुळे मंदिरात थांबून अभिषेक करणे शक्य होईलच असे नाही. म्हणूनच शक्य झाल्यास दर्शन तरी चुकवू नका.
>> महादेवाचे दर्शन घेऊन घरी आल्यावर दिवसभरात आपल्या सवडीने महादेवाला अभिषेक घाला. त्याआधी स्नान करून शुचिर्भूत व्हा. देवाची पूजा करा.
>> महादेवाला बेलपत्र आणि पांढरे फुल वाहून भस्मलेपन करा.
>> गायीचे दूध आणि पाणी एकत्र करून ताम्हनात घेतलेल्या शिवलिंगावर पळीपाळीने अभिषेक करा.
>> हा अभिषेक करताना ओम नमः शिवाय मंत्राचा १०८ वेळा जप करा.
>> ज्यांना रुद्र म्हणता येतो त्यांनी रुद्रपाठ करत अभिषेक करा.
>> ज्यांना शक्य नाही त्यांनी ऑनलाईन हे स्तोत्र लावून अभिषेक करावा. मन एकाग्र होण्यास मदत होईल.
>> पूजा झाल्यावर देवाला आपली इच्छा सांगून ती पूर्ण करण्याची विनंती करा.
>> शुद्ध भाव आणि मनापासून केलेली पूजा महादेवांपर्यंत निश्चित पोहोचते.
त्यामुळे श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी हा सोपा उपाय अजिबात चुकवू नका.