भीष्म द्वादशी आणि जया एकादशीचा दुर्मिळ योगावर भीष्माचार्यानीं दिलेल्या 'या' महामंत्राचे करा पठण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 14:25 IST2026-01-29T14:23:07+5:302026-01-29T14:25:03+5:30
आज जया एकादशी आहे आणि भीष्म द्वादशीसुद्धा, या योगावर दिलेल्या स्तोत्राचे पठण केल्यामुळे होतात अगणित लाभ, तो मंत्र कोणता ते जाणून घेऊ.

भीष्म द्वादशी आणि जया एकादशीचा दुर्मिळ योगावर भीष्माचार्यानीं दिलेल्या 'या' महामंत्राचे करा पठण
आजचा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योगाचा आहे. आज २९ जानेवारी रोजी 'जया एकादशी(Jaya Ekadashi 2026) आणि 'भीष्म द्वादशी(Bhishma Dwadashi 2026) या दोन्ही तिथी एकत्र आल्या आहेत. महाभारतातील महान योद्धा, ज्यांनी शरशय्येवर असूनही धर्माचा मार्ग सोडला नाही, अशा भीष्माचार्यांचे स्मरण आणि त्यांनी दिलेला महामंत्र, त्याचे पठण करणे आजच्या दिवशी भाग्यकारक ठरेल.
उत्तरायण आणि मृत्यूचा गूढ संबंध: भीष्माचार्यांनी का थांबवून ठेवला होता काळ?
भीष्म द्वादशी: उत्तरकार्याचा आणि स्मरणाचा दिवस
भीष्माचार्यांनी माघ शुद्ध नवमीला आपला देह त्यागला होता. भारतीय परंपरेनुसार, त्यांच्या निर्वाणानंतरचे उत्तर विधी द्वादशीला पूर्ण झाले, म्हणून या द्वादशीला 'भीष्म द्वादशी' म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी भीष्मांचे स्मरण करणे म्हणजे आपल्या आयुष्यात संयम आणि भक्तीची जोपासना करणे होय.
विष्णू सहस्त्रनामाचा जन्म आणि भीष्म भक्ती
भीष्म पितामह हे भगवान श्रीकृष्णाचे निस्सीम भक्त होते. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर शरशय्येवर (बाणांच्या शय्येवर) असताना, त्यांनी युधिष्ठिराला राजधर्माचा उपदेश केला. याच वेळी त्यांनी भगवान विष्णूंच्या १००० नावांचे दिव्य स्तोत्र सांगितले, ज्याला आपण 'विष्णू सहस्त्रनाम' म्हणून ओळखतो.
महत्त्वाचा योग: आज जया एकादशी आहे आणि भीष्म द्वादशीचे पर्व सुरू होत आहे. हा योग विष्णू भक्तीसाठी सर्वोत्तम मानला जातो.
Jaya Ekadashi 2026: जया एकादशी ठरणार 'या' राशींसाठी टर्निंग पॉईंट! जाणून घ्या तुमचं भविष्य!
आज विष्णू सहस्त्रनाम पठणाचे महत्त्व का आहे?
१. पापांचा नाश: जया एकादशी ही पिशाच योनीतून मुक्ती देणारी मानली जाते, तर विष्णू सहस्त्रनाम मनातील नकारात्मकता नष्ट करते.
२. मानसिक शांती: भीष्मांनी हे स्तोत्र अत्यंत वेदनेत असतानाही पूर्ण शांत चित्ताने गायले होते. त्यामुळे आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक शांतीसाठी याचे पठण प्रभावी ठरते.
३. भीष्मांचे आशीर्वाद: भीष्म हे चिरंजीवी मानले जातात. त्यांच्या स्मरणाने आणि त्यांनी सांगितलेल्या स्तोत्राच्या पठणाने पितृदोषातून मुक्ती मिळते असे मानले जाते.
Astro Tips: केवळ कष्ट पुरेसे नाहीत! भाग्याची साथ मिळवण्यासाठी करा 'हे' ३ साधे उपाय
आज काय करावे?
भगवान विष्णूंसमोर तुपाचा दिवा लावावा.
शक्य असल्यास सामूहिक किंवा वैयक्तिकरित्या विष्णू सहस्त्रनामाचे श्रवण किंवा पठण करावे.
"ॐ नमो भगवते वासुदेवाय" या मंत्राचा जप करावा.