शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

Rama Ekadashi 2025: दिवाळीची सुरुवात आनंदात व्हावी म्हणून रमा एकादशीला करा 'अशी' विष्णु उपासना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 07:00 IST

Rama Ekadashi 2025: रमा एकादशी ते भाऊबीज हा दीपोत्सव आनंदाने पार पडावा यासाठी विष्णु कृपा महत्त्वाची,म्हणून दिलेले पाच श्लोक त्या दिवशी अवश्य म्हणा!

शहरात दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने केली जात असली तरी शास्त्रानुसार दिवाळी(Diwali 2025) सुरू होते ती रमा एकादशीपासून! त्यानंतर वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, भाऊबीज अशी उत्सवाची रेलचेल असते. म्हणून दिवाळीला सणांची सम्राज्ञी म्हणतात. यंदा १७ ऑक्टोबर रोजी रमा एकादशी(Rama Ekadashi 2025) आणि गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस(Vasu Baras 2025) आहे. तिथून सुरू होणार्‍या आनंद पर्वाची सुरुवात भगवान विष्णूंच्या उपासनेने करूया. 

Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!

शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम् , विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् |लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् , वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ||

अर्थ : क्षीरसागरात शेषशय्येवर भगवान महाविष्णू पहुडले आहेत. ते विश्वाचा आधार आहेत आणि सर्व विश्वावर लक्ष ठेवून आहेत. ते लक्ष्मीपती आहेत, आपल्या कमल नयनांनी विश्वाकडे कारुण्याने, ममत्वतेने पाहत आहेत. त्यांचा रंग सावळा आहे, परंतु, त्या रंगात अखिल विश्व सामावले आहे. अशा महाविष्णूंना माझा नमस्कार असो.

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।। 

भगवान महाविष्णूंनी समस्त जीवांच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. तरी सुद्धा आपण देवावर भार टाकून मोकळे होत नाहै, त्यावर भगवान श्रीकृष्ण गीतेत अर्जुनाला उपदेश करतात, जो अनन्यभावे मला शरण येतो, त्याच्या हाकेला मी नेहमी धावून जातो आणि त्याचा योगक्षेम म्हणजेच अन्न, पाणी, रोजगार मी पुरवतो।.

Diwali 2025: वास्तुशास्त्रानुसार दिवाळीत 'या' सहा वस्तू कोणाकडून भेट घेऊ नका आणि देऊही नका!

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा | बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् | करोमि यद्यत् सकलं परस्मै | नारायणायेति समर्पयामि ||

आरतीच्या शेवटी, घालीन लोटांगण म्हणून झाल्यावर आपण हा श्लोक म्हणतो. मात्र, त्याच्या अर्थाकडे आपले लक्ष जात नाही. विष्णूंची उपासना करण्याच्या निमित्ताने त्याचा अर्थ समजून घेऊया. काया, वाचा, मन, इंद्रिये, बुद्धी, आत्मा या सर्वांचा मेळ होऊन आमच्याकडून कळत-नकळत जे जे काही कार्य घडते, ते आम्ही नारायणाला अनन्यभावे समर्पित करतो.

ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि, तन्नो विष्णू: प्रचोदयात।।

याला 'विष्णू गायत्री' असे म्हणतात. अनेकांना 'ओम तत्सवितु: वरेण्यम' हा एकच सूर्य गायत्री मंत्र माहीत असतो. परंतु, अशा एकूण २४ गायत्री आहेत. पैकी एक, विष्णू गायत्री, जिचा जप आपण विष्णू उपासना म्हणून करू शकतो.

'ओम नमो भगवते वासुदेवाय'

सरतेशेवटी एक मंत्र, जो सहज, सोपा आणि अतिशय परिणामकारक आहे. जपाची एक वेळ ठरवून रोज त्याचवेळी नित्य उपासना केली, तर ती अधिक फलदायी ठरते. 'श्रीराम जय राम जय जय राम', 'ओम नम: शिवाय' या मंत्रांप्रमाणे सदर मंत्राचा १०८ वेळा जप करण्याचा संकल्प आपण सोडू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Rama Ekadashi 2025: Start Diwali with Vishnu worship for happiness!

Web Summary : Rama Ekadashi marks Diwali's beginning. Worship Lord Vishnu for prosperity. Chant mantras like 'Om Namo Bhagavate Vasudevaya' 108 times daily. Understand the meaning of shlokas and dedicate actions to Narayan for blessings and fulfillment.
टॅग्स :Diwaliदिवाळी २०२५Diwali Ritualsदिवाळीतील पूजा विधीekadashiएकादशीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणTraditional Ritualsपारंपारिक विधीPuja Vidhiपूजा विधी