नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:16 IST2025-09-25T16:14:27+5:302025-09-25T16:16:22+5:30
Navratri 2025: नवरात्रात काही गोष्टी करणे स्वतःसाठी आणि घरासाठी फायदेशीर मानले गेले आहे. जाणून घ्या...

नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल!
Navratri 2025: नवदुर्गांची शाश्वत कृपा लाभण्यासाठी नवरात्रीत केलेली उपासना, नामस्मरण, मंत्रांचे जप, अनुष्ठाने, पूजन सर्वोत्तम मानले गेले आहे. २२ सप्टेंबर २०२५ पासून नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे. अवघ्या देशभरात नवरात्रीचा पर्व मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. देवीच्या विविध स्वरुपांचे मनोभावे स्मरण, पूजन केले जाते. देवीच्या शौर्य कथांचे पठण किंवा श्रवण केले जाते. जमेल तशी देवीची सेवा केली जाते. नवरात्रात काही गोष्टी केल्या तर मनातील नैराश्य दूर होण्यासोबतच घरासाठीही अशा गोष्टी उपयुक्त, रामबाण ठरू शकतात, असे सांगितले जाते. जाणून घेऊया... (Do These Things During Navratri)
देशभरातील भाविक या नऊ दिवसात आपापल्या पद्धतीप्रमाणे देवीचे पूजन, व्रताचरण करतात. नवरात्र हा सत्त्व-रज-तम अशा त्रिगुणविशेषात अवतरलेल्या महाकाली, महालक्ष्मी, आणि महासरस्वती अशा तीन देवतांच्या पराक्रमाचा गुणगौरव करणारा व्रतोत्सव आहे. आपल्याकडे नवरात्र उत्सव साजरा करण्याची परंपरा फार प्राचीन काळापासून आहे. नऊ दिवस देवीची पूजा करतात. रोज माळ बांधणे, कुमारीचे पूजन करणे, अखंड दीप लावणे, उपवास करणे, सप्तशतीचा पाठ करणे, सुवासिनींना भोजन घालणे, असे विविध कुळाचार, कुळधर्म केले जातात.
नवरात्रोत्सव काळात काय करावे? । Navratri Vastu Tips
- घरातील मुख्य प्रवेशद्वारावर कुंकवाने स्वस्तिक काढावे. स्वस्तिक काढल्यानंतर दररोज नियमितपणे त्याचे पूजन करावे. धूप, दीप अर्पण करावे. प्रवेशद्वारावर काढलेल्या स्वस्तिकामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊ शकेल, असे सांगितले जात आहे.
- भारतीय संस्कृती, परंपरांमध्ये तोरण लावण्याचा विशेष महत्त्व आहे. कोणत्याही शुभकार्यावेळी अथवा सण-उत्सवावेळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तोरण बांधले जाते. नवरात्रात घरात तसेच प्रवेशद्वारावर तोरण लावावे.
- तोरण लावण्याने सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. सकारात्मक ऊर्जेच्या संचारामुळे कौटुंबिक वातावरण आनंदी, उत्साही तसेच सकारात्मक राहण्यास मदत मिळते, असे सांगितले जाते.
- लक्ष्मी देवी हे दुर्गा देवीचेच एक रुप असल्याचे सांगितले जाते. घराच्या प्रवेशद्वारावर चंदन किंवा कुंकवाने लक्ष्मीची पाऊले रेखाटावीत. याचे पूजन करावे.
- असे केल्याने लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात. तसेच सकारात्मकतेचा संचार घरात होतो. लक्ष्मी देवीच्या कृपादृष्टीमुळे नकारात्मकता जाऊन सुख, समृद्धी, शांतता, प्रसन्नता कुटुंबात नांदते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
- नवरात्रात घरच्या घरी दुर्गा देवीचे, लक्ष्मी देवीचे पूजन केले, तरी एखाद्या शुभदिनी शक्य असल्यास देवीच्या मंदिरात जाऊन मिठाई अर्पण करावी. यात पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा प्रामुख्याने समावेश करावा, असे सांगितले जात आहे.
- असे केल्याने देवीची कृपा होऊन धन, धान्य यांची कमतरता भासणार नाही. कुटुंबात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. तसेच या उपायामुळे लोकांच्या वाईट नजरा, दृष्ट लागण्यापासून घराचे संरक्षण होईल, असे म्हटले जाते.
- तुळस धार्मिक, आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टिने अतिशय महत्त्वाची आहे. बहुपयोगी आणि पवित्र मानली गेलेली तुळस घरात लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. आपल्या घरात तुळस लावली नसेल, तर नवरात्रात एखादा शुभ मुहूर्त पाहून तुळशीची स्थापन करावी, असे सांगितले गेले आहे.
- ररोज सकाळी आणि सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावावा, पूजन करावे, न चुकता पाणी घालावे, असे सांगितले जाते. तुळस पूजनाने श्रीविष्णूंसह लक्ष्मी देवीही प्रसन्न होतात आणि दोन्ही देवता आपणास शुभाशिर्वाद देतात, असे म्हटले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.