शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
2
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
3
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
4
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
5
Viral Video: "दातं आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
6
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
7
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
8
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
9
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
10
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
11
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
12
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
13
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
14
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
15
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
17
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
18
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
19
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार
20
'या'साठी रशियासोबत भागीदारी करण्याच्या तयारीत भारत, चीनला झटका देणार; अवलंबित्व कमी करणार

Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 16:22 IST

Narak Chaturdashi 2025 Abhyanga Snan: यंदा सोमवारी २० ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी आहे, दिवाळीची पहिली अंघोळ आणि कारीट फोडण्याचा विधी या दिवशी का करतात ते पाहू. 

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिवाळीची(Diwali 2025) दणक्यात सुरुवात झाली आहे. पावसाने वेळेतच माघार घेतल्याने लोकांच्या उत्साहावर पाणी फिरले नाही. १७ ऑक्टोबर रोजी वसुबारसेने दीपोत्सव सुरु झाला असून, १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी, २० ऑक्टोबरला नरक चतुर्दशी, २१ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन(Laxmi Pujan 2025), २२ ऑक्टोबरला बलिप्रतिपदा, २३ ऑक्टोबरला भाऊबीज(Bhai Dooj 2025) असा भरगच्च आठवडा असणार आहे. 

Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?

अशातच नरक चतुर्दशीच्या सणाला पहिल्या अंघोळीचा मान मिळाला आहे. या दिवशी अभ्यंग स्नान व कारीट फोडणे या दोन प्रमुख पारंपरिक गोष्टी भल्या पहाटे केल्या जातात. त्यामागे नेमके कारण काय? ते जाणून घेऊ. 

दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवातील दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी(Narak Chaturdashi 2025). या दिवसाला 'छोटी दिवाळी' असेही म्हणतात. नरक चतुर्दशी साजरी करण्यामागे एक प्रमुख पौराणिक कथा आहे आणि याच कथेमुळे या दिवशी अभ्यंग स्नान आणि कारीट फोडणे या दोन खास परंपरा पाळल्या जातात.

नरक चतुर्दशीची पौराणिक कथा:

प्राचीन काळात नरकासुर नावाच्या एका अत्यंत क्रूर आणि शक्तिशाली राक्षसाने आपल्या शक्तीच्या जोरावर देवांना, ऋषींना, सर्वसामान्य लोकांना खूप त्रास दिला. त्याने १६,००० राजकन्यांना बंदी बनवून ठेवले होते आणि अनेक स्त्रियांचा छळ केला. त्याच्या या अत्याचाराला कंटाळून लोकांनी भगवान श्रीकृष्णाला मदतीची याचना केली.

भगवान श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामा हिच्या मदतीने नरकासुराशी युद्ध केले. याच दिवशी, म्हणजेच आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला, श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून लोकांना त्याच्या तावडीतून मुक्त केले. नरकासुराच्या वधानंतर, लोकांनी अत्याचारातून मुक्त झाल्याचा आनंद म्हणून हा दिवस उत्सवासारखा साजरा केला, जो पुढे नरक चतुर्दशी म्हणून ओळखला जाऊ लागला.

अभ्यंग स्नानाचे महत्त्व (पापांचा नाश) : 

नरकासुराचा वध करून परतल्यानंतर श्रीकृष्णाच्या शरीराला त्याच्या रक्ताचे आणि घामाचे डाग लागले होते. हे डाग धुऊन शरीर शुद्ध करण्यासाठी श्रीकृष्णाला सुंगधी तेल, उटणे लावून जे स्नान घातले, त्यावरूनच अभ्यंग स्नानाची प्रथा सुरू झाली. हे स्नान पहाटे सूर्योदयापूर्वीच करायचे असते.  मान्यतेनुसार, नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान केल्याने मनुष्याचे वर्षभरातील सर्व पाप धुतले जाते. या दिवशी स्नान केल्यास नरक यातनांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. अभ्यंग स्नानानंतर यमतर्पण केल्याने अकाली मृत्यूचे भय टळते.

Happy Diwali 2025 Wishes: दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा दीपावलीचा सण!

कसे करावे यमतर्पण?

तांब्याच्या कलशात पाणी, काळे तीळ घेऊन दक्षिण दिशेला ते पाणी यमाला अर्पण करत पुढील मंत्र म्हणा. 

ॐ यमाय नमः। ॐ धर्मराजाय नमः। ॐ मृत्यवे नमः। ॐ अन्ताकाय नमः। ॐ वैवस्वताय नमः। ॐ कालाय नमः। ॐ सर्वभूतक्षयाय नमः। ॐ औदुम्बराय नमः। ॐ दध्राय नमः। ॐ नीलाय नमः। ॐ परमेष्ठिने नमः। ॐ वृकोदराय नमः। ॐ चित्राय नमः। ॐ चित्रगुप्ताय नमः।

अर्पण केलेले पाणी घरात न सांडू देता, ते पिंपळाच्या झाडाला किंवा अन्य कोणत्याही झाडाला अर्पण करावे.

कारीट फोडण्याची प्रथा 

अभ्यंग स्नानापूर्वी कारीट नावाचे एक फळ (जे कडवट असते) ते पायाने फोडण्याची प्रथा आहे. ही प्रथा नरक चतुर्दशीचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण, कारीट हे नरकासुराचे प्रतीक मानले जाते. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, याचे प्रतीक म्हणून नरक चतुदर्शीला पहाटे पाय ठेवून कारीट फोडले जाते. कारीट फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारा लालसर किंवा पिवळसर रस हा नरकासुराच्या रक्ताचे प्रतीक मानला जातो. हे कृत्य वाईटावर आणि पापांवर विजय मिळवल्याचा शुभ संकेत देते. कारीट फोडल्यानंतर येणारा कडवट वास नरकासुरानंतर दूर झालेल्या अत्याचार आणि वाईट शक्तींचे प्रतीक मानले जाते. यानंतर सुगंधी अभ्यंगस्नान करून शुद्ध आणि सात्विक जीवनाची सुरुवात केली जाते.

थोडक्यात, नरक चतुर्दशी ही केवळ दिवाळीची तयारी नाही, तर ती अत्याचारावर धर्माचा विजय आणि पापावर पुण्याने मिळवलेला विजय दर्शवते. या दिवशी अभ्यंग स्नान आणि कारीट फोडण्याची प्रथा पाळून, प्रत्येकजण आपल्या जीवनातील वाईट प्रवृत्ती आणि नकारात्मकतेवर विजय मिळवण्यास बळ देते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Narak Chaturdashi 2025: Significance of Abhyang Snan and Karit Breaking

Web Summary : Narak Chaturdashi celebrates Lord Krishna's victory over Narakasura. The traditions of Abhyang Snan (ritualistic bath) signifies purification, while breaking 'karit' symbolizes destroying evil. These customs herald a fresh, virtuous beginning, triumphing over negativity.
टॅग्स :Diwaliदिवाळी २०२५Diwali Ritualsदिवाळीतील पूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीLord Krishnaभगवान श्रीकृष्णPuja Vidhiपूजा विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण