मार्गशीर्ष गुरुवार: पुण्याजवळील जागृत दशभुजा दत्त मंदिर: जिथे 'नास्तिक' अधिकारी झाला दत्तभक्त!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 11:40 IST2025-12-11T11:39:21+5:302025-12-11T11:40:35+5:30
Margashirsha Guruvar 2025: आज मार्गशीर्षाचा दुसरा गुरुवार, त्यानिमित्त जाणून घेऊया दशभुजा दत्त मंदिराबद्दल, जिथे स्वामी समर्थांच्या कृपेने जागृत देवस्थान उभारले गेले.

मार्गशीर्ष गुरुवार: पुण्याजवळील जागृत दशभुजा दत्त मंदिर: जिथे 'नास्तिक' अधिकारी झाला दत्तभक्त!
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात, नीरा नदीच्या पावन भूमीपासून जवळच वसलेले लोणी भापकर हे गाव आहे. या गावाचे खरे भाग्य म्हणजे येथील अत्यंत जागृत असे श्री दशभुजा दत्तमंदिर. हे केवळ एक प्राचीन देऊळ नाही, तर येथे आजही सद्गुरू दत्तानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या अस्तित्वाची आणि त्यांच्या अद्भुत चमत्कारांची ऊर्जा जाणवते आणि इथे असलेली दशभुजा दत्तमूर्ती भारतात अन्यत्र कुठेही आढळणार नाही, आज मार्गशीर्ष गुरुवारनिमित्त(Margashirsha Guruvar 2025) जाणून घेऊ.
वार्षिक राशीभविष्य २०२६: संपत्ती, करिअर आणि कौटुंबिक जीवनात कोणत्या राशींना मिळणार मोठे यश?
दत्तमंदिराचा इतिहास :
आज जिथे हे भव्य दगडी मंदिर दिमाखाने उभे आहे, ते स्थान एकेकाळी ओसाड रान होते. मंदिराच्या परिसरात उंचच उंच निवडुंग, घनदाट झाडी आणि सर्पांचा वावर असल्याने, भीतीमुळे कोणीही त्या प्राचीन श्रीशैल्यमल्लिकार्जुन देवाच्या दर्शनाला जात नसे.
अशा या निर्जन आणि भयावह स्थळी, सुमारे १९०८ साली, ब्रह्मीभूत सद्गुरू दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी मुक्काम ठोकला. त्यांचे आगमन होताच, त्या जागेबद्दल वाटणारी भीती दूर झाली आणि लोकांचा ओघ त्यांच्या दर्शनासाठी सुरू झाला. त्यांनी शके १८३० (सन १९०८) मध्ये येथे श्रीदत्तपादुकांची स्थापना केली आणि नंतर १९२८ मध्ये (शके १८५०) या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली.
दशभुजा दत्तमूर्तीचे तेज
लोणी भापकर हे स्थान विशेष आहे, कारण येथे दशभुजा (दहा हात) असलेली दत्तमूर्ती पाहायला मिळते. अशी मूर्ती क्वचितच आढळते आणि त्यामुळे हे स्थान अधिक महत्त्वाचे ठरते. जयपूरहून आणलेल्या संगमरवरी दगडाची ही अडीच फूट उंचीची मोहक मूर्ती उत्तम दगडी सिंहासनावर विराजमान आहे.
Puja Rituals: उदबत्तीची रक्षा, जळलेल्या वाती तुम्ही कचऱ्यात तर फेकून देत नाही ना?
हे मंदिर पुरातत्व विभागामार्फत संरक्षित असल्याने त्याची भव्यता आणि प्राचीनता आजही टिकून आहे. मंदिराच्या मध्यभागी श्रीदत्तपादुका, मागे औदुंबराचा कल्पवृक्ष आणि पारायणासाठी बांधलेल्या ओवऱ्या, यामुळे हे स्थान भजन, कीर्तन आणि गुरुचरित्र पारायणाचे मुख्य केंद्र बनले आहे.
नास्तिक अधिकारी ते परमभक्त स्वामी
श्री दत्तानंद सरस्वती स्वामी महाराजांचे पूर्वायुष्य फारच विलक्षण होते. त्यांच्या जन्मगावाची किंवा राहण्याच्या ठिकाणाची निश्चित माहिती उपलब्ध नाही. पण ते इंग्रजांच्या काळात सैन्यामध्ये मोठे अधिकारी होते. डांग देशातील बंडाळीचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांना पाठवण्यात आले होते.
ते स्वभावतः अत्यंत नास्तिक होते. परंतु, त्यांच्या आयुष्यात असा एक क्षण आला, जेव्हा त्यांची भेट श्री अक्कलकोटच्या स्वामींशी झाली. या दोन महान आत्म्यांची दृष्टादृष्ट होताच, त्या करारी अधिकाऱ्याचा संपूर्ण नास्तिकपणा एका क्षणात नष्ट झाला आणि त्यांना तत्काळ उपदेश मिळाला. त्यांचे रूपांतर एका परमभक्तात झाले.
स्वामी महाराज हे धष्टपुष्ट, उंच, गौरवर्णाचे आणि अत्यंत करारी व्यक्तिमत्त्वाचे होते. त्यांना लहान मुलांसोबत खेळायला खूप आवडायचे. श्रीदत्त-नृसिंहसरस्वती अशी त्यांची महान आध्यात्मिक परंपरा सांगितली जाते.
वानप्रस्थाश्रम स्वीकारल्यावर नेपाळ प्रांतातून फिरत, आळंदीमार्गे सोमयाचे करंजे येथे येऊन ते लोणी भापकरला प्रकट झाले आणि याच भूमीत शके १८३८ (सन १९१६) मध्ये त्यांनी समाधी घेतली.
Astrology: आयुष्य बदलेल! जाणून घ्या चांदीची अंगठी धारण करण्याचे 'हे' ५ चमत्कारी फायदे!
लोणी भापकरचे हे दशभुजा दत्तमंदिर आजही अत्यंत जागृत श्रद्धास्थान आहे. स्वामी महाराजांनी केलेल्या चमत्कारांची ७ अध्यायांची पोथी (चरित्र) आजही भक्त नियमित वाचतात. हे स्थान भक्तांना नवसपूर्तीचा अनुभव देणारे आणि मानसिक शांती देणारे तीर्थक्षेत्र आहे. पाहा हा व्हिडिओ -