Makar Sankranti 2026: संक्रांतीला काळे कपडे घालणार? थांबा! 'या' ३ चुका केल्यास होऊ शकतो उलट परिणाम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 11:41 IST2026-01-13T11:38:14+5:302026-01-13T11:41:33+5:30
Makar Sankranti 2026 Black Clothes Outfit: सणासुदीला काळे कपडे घालण्याचा ऑफिशिअल दिवस म्हणजे मकर संक्रांती, पण यंदा एकादशी आणि संक्रांत संयोगामुळे पुढील ३ नियम पाळा.

Makar Sankranti 2026: संक्रांतीला काळे कपडे घालणार? थांबा! 'या' ३ चुका केल्यास होऊ शकतो उलट परिणाम!
Makar Sankranti Do And Don'ts: भारतीय पंचांगानुसार, यंदा मकर संक्रांतीचा (Makar Sankranti 2026) सण आणि षटतिला एकादशीचा(Shat Tila Ekadashi 2026) तिथीचा एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहे. मकर संक्रांत म्हणजे सूर्याचे संक्रमण आणि एकादशी म्हणजे भगवान विष्णूंची प्रिय तिथी. या दोन्ही दिवशी केलेल्या चुका तुमच्या भाग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात.
यंदा १४ जानेवारी (बुधवार) रोजी हा योग येत असल्याने, खालील ३ चुका टाळणे तुमच्या प्रगतीसाठी अनिवार्य आहे, असे मत ज्योतिषी अरुण कुमार व्यास यांनी व्यक्त केले आहे. त्या तीन चुका कोणत्या ते जाणून घेऊ.
१. चुकूनही तांदळाचे सेवन करू नका (No Rice Consumption)
एकादशीच्या दिवशी तांदूळ न खाणे हा शास्त्रातील सर्वात महत्त्वाचा नियम आहे. धार्मिक मान्यतेनुसार, एकादशीला भात खाणे 'अधर्माचे' मानले जाते. जरी संक्रांतीचा सण असला, तरी एकादशी तिथी असल्याने या दिवशी खिचडी किंवा भाताचे पदार्थ टाळावेत. त्याऐवजी उपास नसेल तर बाजरीची भाकरी आणि इतर फळांचा आहार घ्यावा. तिळगुळाचे सेवनही चालू शकेल.
२. काळ्या रंगाचे कपडे टाळा (Avoid Black Clothes)
साधारणपणे संक्रांतीला काळे कपडे घालण्याची प्रथा असली, तरी यंदा परिस्थिती वेगळी आहे. या दिवशी एकादशी सुध्दा आली आहे. संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे राशी परिवर्तन होत आहे. सूर्य हा प्रकाशाचा आणि ऊर्जेचा कारक आहे. ज्योतिषांनुसार, जेव्हा ग्रहांचे मोठे संक्रमण होत असते, तेव्हा नकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारे 'काळे कपडे' परिधान करणे भाग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे तुमच्या प्रगतीत अडथळे येऊ शकतात. तसेच एकादशीला विष्णूंना प्रिय असणाऱ्या पिवळ्या, केशरी किंवा लाल रंगाच्या कपड्यांना प्राधान्य द्या आणि रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू समारंभात काळे कपडे परिधान करा.
Makar Sankranti 2026: कोणत्या राशींवर यंदा 'संक्रांत'? कोणाला मिळणार यश आणि कोणाला सावधानतेचा इशारा?
३. वाणीचा संयम राखा - अपशब्द टाळा (Watch Your Words)
यंदाची संक्रांत बुधवारी येत आहे. 'बुध' हा ग्रह बुद्धी आणि वाणीचा कारक मानला जातो. एकादशीच्या पवित्र दिवशी आणि बुधवारी कोणालाही अपशब्द बोलणे, कोणाचा अपमान करणे किंवा खोटे बोलणे यामुळे तुमचा 'बुध' ग्रह बिघडू शकतो. याचा परिणाम तुमच्या करिअरवर आणि व्यवसायावर वर्षभर जाणवू शकतो. संक्रांतीचा संदेशच 'गोड बोला' असा आहे, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. पाहा व्हिडीओ -
टीप : ही ज्योतिषांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी लोकमत सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.