Makar Sankranti 2026: संक्रांतीच्या संध्याकाळी तुळशीजवळ करा 'हे' २ छोटे उपाय; वर्षभर राहील लक्ष्मीची कृपा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:29 IST2026-01-14T17:28:06+5:302026-01-14T17:29:33+5:30
Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरु होते, अशा काळात घरात सकारात्मक ऊर्जा वाढावी आणि कुटुंबीयांची प्रगती व्हावी म्हणून दिलेले उपाय करा.

Makar Sankranti 2026: संक्रांतीच्या संध्याकाळी तुळशीजवळ करा 'हे' २ छोटे उपाय; वर्षभर राहील लक्ष्मीची कृपा!
मकर संक्रांतीला(Makar Sankranti 2026) सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो, ज्यामुळे देवांचा दिवस सुरू होतो. या शुभ मुहूर्तावर दान-धर्माला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व संध्याकाळी केल्या जाणाऱ्या छोट्या उपायांनाही आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात सुख-शांती राहावी आणि आर्थिक भरभराट व्हावी, तर संक्रांतीच्या संध्याकाळी तुळशीजवळ 'हे' दोन उपाय कोणाच्याही नकळत आवर्जून करा.
Makar Sankranti 2026: मकर संक्रांत ते रथसप्तमी; हळदी-कुंकवासाठी हाच काळ का निवडला जातो?
उपाय १: तिळाच्या तेलाचा दिवा आणि प्रभावी मंत्र
मकर संक्रांतीला 'तीळ' वापरण्याचे विशेष महत्त्व आहे. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तुळशीच्या कोठ्याजवळ किंवा वृंदावनापाशी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.
कसे करावे? दिवा लावल्यानंतर तुळशीला मनोभावे नमस्कार करा आणि तिथे बसून "ओम नमो भगवते वासुदेवाय नमः" या मंत्राचा ११ वेळा जप करा.
फायदा: या उपायाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष कमी होतात आणि मनाला शांती मिळते.
Makar Sankranti 2026: किंक्रांत म्हणजे नेमके काय? जाणून घ्या हा दिवस खरंच अशुभ असतो का?
उपाय २: हळद-मिश्रित तांदळाचे अर्पण
दुसरा उपाय तुमच्या घरातील नकारात्मकता (Negative Energy) नष्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो.
कसे करावे? एका छोट्या चमचाभर तांदळात चिमूटभर हळद मिसळून ते तांदूळ पिवळे करा. त्यानंतर हे हळद मिश्रित तांदूळ तुळशीच्या चरणी किंवा कुंडीत अर्पण करा.
फायदा: ज्योतिषशास्त्रानुसार हळद ही गुरु ग्रहाशी संबंधित आहे, तर तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक आहेत. हा उपाय केल्याने घरातील इडा-पीडा दूर होते आणि घराची भरभराट होण्याचे मार्ग मोकळे होतात.
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक स्वभावाने तीळगुळाहून गोड, पण चिडले की समोरच्यावर संक्रांत!