Makar Sankrant 2026: यंदा संक्रांत आणि एकादशीचा दुर्मिळ योग; खिचडी नाही, तर करा 'या' वस्तूंचे दान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 17:13 IST2026-01-08T17:12:52+5:302026-01-08T17:13:58+5:30
Makar Sankrant 2026 Daan Importance: मकर संक्रांतीला अनेक जण तांदळाची वा बाजरीची खिचडी गरजूंना दान करतात किंवा शिधा देतात, यंदा मात्र त्यात बदल करावा लागणार आहे.

Makar Sankrant 2026: यंदा संक्रांत आणि एकादशीचा दुर्मिळ योग; खिचडी नाही, तर करा 'या' वस्तूंचे दान
मकर संक्रांत(Makar Sankranti 2026) म्हटली की, तीळ-गुळ आणि खिचडीच्या दानाला अनन्यसाधारण महत्त्व असते. मात्र, यंदा १४ जानेवारी २०२६ रोजी एक विशेष धार्मिक पेच निर्माण झाला आहे. या दिवशी मकर संक्रांतीसोबतच 'षटतिला एकादशी' देखील आहे. या योगामुळे यंदा दानाचे नियम बदलले आहेत.
Makar Sankranti 2026: यंदा 'संक्रांत' कोणावर? जाणून घ्या तिचे वाहन, वस्त्र, शस्त्र आणि राशीभविष्य!
तांदळाचे दान यंदा निषिद्ध का?
हिंदू धर्मात एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणे आणि तांदळाचा वापर करणे वर्ज्य मानले जाते. मकर संक्रांतीला तांदूळ आणि मुगाच्या डाळीची 'खिचडी' दान करण्याची जुनी परंपरा आहे. परंतु, यंदा संक्रांतीच्या दिवशीच एकादशी आल्यामुळे तांदळाची खिचडी दान करणे शास्त्राला धरून होणार नाही. एकादशीला तांदळाचा स्पर्श किंवा दान केल्यास एकादशीच्या व्रतात बाधा येऊ शकते.
'खिचडी' ऐवजी काय दान करावे?
एकादशी आणि संक्रांत या दोन्ही व्रतांचे पूर्ण पुण्य मिळावे यासाठी यंदा भाविकांनी खालील वस्तूंचे दान करावे:
१. तीळ आणि गूळ: षटतिला एकादशीला तिळाच्या दानाचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळे यंदा केवळ तीळ आणि गुळाचे दान करणे सर्वश्रेष्ठ ठरेल.
२. कोरडा शिधा: तांदूळ सोडून इतर धान्य (उदा. बाजरी, गहू किंवा डाळी) तुम्ही दान करू शकता.
३. वस्त्र आणि ऊबदार कपडे: थंडीचे दिवस असल्याने गरिबांना ब्लँकेट किंवा कपड्यांचे दान करणे अधिक फलदायी ठरेल.
Chanakya Niti: लोकांमध्ये तुमची किंमत शून्य आहे? चाणक्य नीतीचे 'हे' ५ नियम वापरा, जग तुमचा आदर करेल!
खिचडी दान कधी करावे?
परंपरा मोडू नये यासाठी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे १५ जानेवारीला, तुम्ही तांदळाच्या खिचडीचे दान करू शकता. यामुळे संक्रांतीची परंपराही जपली जाईल आणि एकादशीच्या नियमाचे उल्लंघनही होणार नाही.
देवाचा नैवेद्य आणि उपास
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, "उपास आपला असतो, देवाचा नाही." त्यामुळे जरी आपण एकादशीमुळे तांदूळ खाणार नसलो, तरी देवाला दाखवला जाणारा नैवेद्य हा नेहमीप्रमाणे 'पूर्ण अन्नाचा' असावा. देवाला नैवेद्य अर्पण करताना तुम्ही नेहमीचे पदार्थ वापरू शकता, मात्र स्वतः तो प्रसाद म्हणून ग्रहण करताना एकादशीचे नियम पाळावेत.
Ritual: एखाद्याची खोटी शपथ घेतल्याने ती व्यक्ती खरोखरंच मरते का? जाणून घ्या गंभीर परिणाम