Mahashivratri 2026: यंदाची महाशिवरात्री खास, दोन दुर्मिळ योग एकत्र; इच्छापूर्तीसाठी करा 'हे' छोटेसे काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 13:34 IST2026-02-06T13:32:21+5:302026-02-06T13:34:05+5:30
Mahashivratri 2026 Remedies: रविवार १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे, या दिवशी इच्छित मनोकामनापूर्तीसाठी, विशेषतः संतानप्राप्तीसाठी दिलेला उपाय जरूर करा.

Mahashivratri 2026: यंदाची महाशिवरात्री खास, दोन दुर्मिळ योग एकत्र; इच्छापूर्तीसाठी करा 'हे' छोटेसे काम
यंदाची महाशिवरात्री केवळ धार्मिक सण म्हणून नाही, तर 'सर्वार्थसिद्धी' आणि 'अमृतसिद्धी' यांसारख्या दुर्मिळ योगांच्या संयोगामुळे आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत शक्तिशाली ठरणार आहे. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी येणाऱ्या या महाशिवरात्रीला (Mahashivratri 2026) महादेवांची कृपा कशी मिळवावी, यावर शुभम लोकरे गुरुजी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
महाशिवरात्री हा भगवान शिवाची आराधना करण्याचा सर्वोच्च दिवस. पण १५ फेब्रुवारीचा हा दिवस विशेष आहे, कारण या दिवशी 'सर्वार्थसिद्धी' आणि 'अमृतसिद्धी' हे दोन अत्यंत शुभ योग एकत्र येत आहेत. ज्योतिषशास्त्रात हे योग कोणतेही कार्य सिद्ध करण्यासाठी आणि मनोकामना पूर्तीसाठी सर्वोत्तम मानले जातात.
शुभम लोकरे गुरुजी सांगतात की, महादेव एरव्ही ध्यानमग्न असतात, परंतु महाशिवरात्रीच्या या पवित्र मुहूर्तावर ते आपल्या भक्तांसाठी ध्यानावस्थेतून बाहेर येतात. या दिवशी शिव अत्यंत जागृत अवस्थेत असतात, त्यामुळे भक्ताने केलेली थोडीशी सेवा आणि आर्त साद थेट महादेवांपर्यंत पोहोचते.
Astro Tip: ६ फेब्रुवारी : मिठाची एक चिमूट, तुमचं नशीब पालटणार; आजच करा हा उपाय
कोणतीही मनोकामना, तसेच संतान प्राप्तीसाठी विशेष विधी:
इच्छापूर्ती तसेच ज्या दांपत्यांना संतान सुखाची अपेक्षा आहे, त्यांच्यासाठी गुरुजींनी एक विशेष उपाय सुचवला आहे:
१. स्नान आणि संकल्प: सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत.
२. तूप अभिषेक: गायीचे शुद्ध तूप थोडे कोमट (गरम) करावे. हे तूप शिवलिंगावर १०८ वेळा अर्पण करत अभिषेक करावा.
३. नैवेद्य: महादेवांना दही-भाताचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे अभिषेकानंतर दही-भाताचा नैवेद्य अर्पण करावा.
४. मनोकामना: आपली इच्छा किंवा मनातले मनोरथ मनोभावे महादेवाला सांगावे.
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात नशिबाचे धनी; आयुष्यभर लाभतं अमाप सुख-समाधान!
दिवसभराची साधना कशी असावी?
उपवास: महाशिवरात्रीचा पूर्ण दिवस उपवास करावा.
भस्म धारण: कपाळावर भस्म लावावे, जे शिवाला अत्यंत प्रिय आहे आणि वैराग्याचे प्रतीक आहे.
चिंतन: दिवसभर 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा जप किंवा महादेवाचे चिंतन करावे. पाहा व्हिडीओ -