Mahashivratri 2026: महाशिवरात्रीपूर्वी ७ दिवस करा 'हा' उपाय; अनुभवा महादेवाच्या शक्तीचा चमत्कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 10:05 IST2026-02-09T10:03:51+5:302026-02-09T10:05:00+5:30

Mahashivratri 2026 Spiritual Remedy: महाशिवरात्रीपूर्वी सलग ७ दिवस म्हणजेच आजपासून 'हा' छोटा विधी करा आणि अनंत अडचणींवर मात मिळवा. 

Mahashivratri 2026: Do 'this' remedy for 7 days before Mahashivratri; Experience the miracle of Lord Shiva's power! | Mahashivratri 2026: महाशिवरात्रीपूर्वी ७ दिवस करा 'हा' उपाय; अनुभवा महादेवाच्या शक्तीचा चमत्कार!

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीपूर्वी ७ दिवस करा 'हा' उपाय; अनुभवा महादेवाच्या शक्तीचा चमत्कार!

महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर महादेवाची कृपा संपादन करण्यासाठी 'कुंदकेश्वर महादेव' यांचा हा मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो. रविवार १५ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीच्या(Mahashivratri 2026) पार्श्वभूमीवर, आजपासून सुरू होणारा हा ७ दिवसांचा विधी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो, ते पाहू. 

Mahashivratri 2026: यंदाची महाशिवरात्री खास, दोन दुर्मिळ योग एकत्र; इच्छापूर्तीसाठी करा 'हे' छोटेसे काम

महाशिवरात्री म्हणजे भगवान शंकराच्या उपासनेचा सर्वात मोठा उत्सव. यंदा रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्री साजरी होत आहे. या शुभ दिवसाचे फळ मिळवण्यासाठी केवळ त्या दिवशी पूजा करून चालत नाही, तर त्याआधी आपली मानसिक आणि आध्यात्मिक तयारी असणे आवश्यक असते. म्हणूनच, आजपासून सुरू होणारा कुंदकेश्वर महादेवांचा हा ७ दिवसांचा प्रयोग तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो.

कुंदकेश्वर महादेव आणि आचमन विधी

भगवान शंकराचे 'कुंदकेश्वर' रूप हे संकटांचे निवारण करणारे आणि मानसिक शांती देणारे मानले जाते. जर तुमच्या मनात अनामिक भीती असेल, सतत नैराश्य येत असेल किंवा कामात अडचणी येत असतील, तर हा विधी नक्की करा:

विधी कसा करावा? 

१. वेळ: हा विधी सूर्योदयानंतर सकाळी लवकर करावा. 
२. कृती: सूर्याकडे तोंड करून उभे राहा. उजव्या हाताच्या तळहातावर (ओंजळीत) किंवा चमचाभर पाणी घ्या. 
३. मंत्र जप: पाण्याचा स्वीकार करण्यापूर्वी डोळे मिटून 'ओम कुंदकेश्वर महादेवाय नमः' हा मंत्र ११ वेळा म्हणा. 
४. आचमन: मंत्र म्हणून झाल्यावर ते पाणी प्या (यालाच आचमन म्हणतात). 
५. प्रार्थना: पाणी पिल्यानंतर मनोभावे प्रार्थना करा - "हे कुंदकेश्वर महादेव, माझ्या आयुष्यातील दुःख, अडचणी दूर करून मला सकारात्मक ऊर्जा दे आणि जगण्याची नवी प्रेरणा दे."

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला नागा साधूंच्या आखाड्यांचे 'हे' रूप पाहिले का? साक्षात शिवलोकाची अनुभूती!

या मंत्राचा प्रभाव काय होतो?

असे मानले जाते की, कुंदकेश्वर महादेवांच्या या मंत्रात विलक्षण ताकद आहे.

नकारात्मकता दूर होते: मनातील भीती, चिंता आणि नैराश्याचे ढग दूर होतात.

सकारात्मक ऊर्जा: शरीरात आणि मनात नवीन उत्साहाचा संचार होतो.

कार्यात यश: अडकलेली कामे मार्गी लागतात आणि महादेवाची विशेष कृपा प्राप्त होते.

या महाशिवरात्रीला केवळ उपवास न करता, श्रद्धेने हा ७ दिवसांचा विधी करा आणि अनुभवा महादेवाच्या शक्तीचा चमत्कार!

Valentine Week 2026: 'या' जन्मतारखांचे लोक असतात 'मेड फॉर इच अदर'; व्हॅलेंटाईन वीक निमित्त खास उलगडा

Web Title : महाशिवरात्रि २०२६: दिव्य आशीर्वाद और सकारात्मक ऊर्जा के लिए ७ दिवसीय अनुष्ठान।

Web Summary : महाशिवरात्रि २०२६ से पहले, ७ दिवसीय कुंदकेश्वर महादेव अनुष्ठान नकारात्मकता को दूर करने, सकारात्मक ऊर्जा भरने और सफलता लाने के लिए माना जाता है। 'ओम कुंदकेश्वर महादेवाय नमः' मंत्र का जल से जाप आंतरिक शांति और दिव्य कृपा का अनुभव करने की कुंजी है।

Web Title : Mahashivratri 2026: 7-day ritual for divine blessings and positive energy.

Web Summary : Ahead of Mahashivratri 2026, a 7-day Kundkeshwar Mahadev ritual is believed to remove negativity, instill positive energy, and bring success. Performing the 'Om Kundkeshwar Mahadevay Namah' mantra with water is key to experiencing inner peace and divine grace.