शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

शनी प्रकोपापासून बचाव करण्यासाठी जाणून घ्या सटीक उपाय; उघडतील यशाची दारे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 08:52 IST

शनीच्या राशीबदलामुळे धनु राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल, त्याचवेळेस मीन राशीच्या लोकांची साडेसाती सुरू होईल. तसेच २ राशीच्या लोकांना शनीच्या राशी बदलामुळे दिलासा मिळेल, तसेच २ राशीच्या लोकांवर शनीची कृपादृष्टी होईल.

शनिदेव हे कर्माचे दाता आहेत, म्हणजेच कर्मानुसार फळ देतात. जर व्यक्तीची कृती चांगली नसेल तर शनि शुभ स्थितीतही चांगले फळ देत नाही. आणि ग्रहस्थिती वाईट असेल पण कर्म चांगले असेल तर वाईट स्थितीतही ते शुभ फळ देतात. मात्र  वाईट कर्म करणाऱ्यांना शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो. 

शनीच्या राशीबदलामुळे धनु राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल, त्याचवेळेस मीन राशीच्या लोकांची साडेसाती सुरू होईल. तसेच २ राशीच्या लोकांना शनीच्या राशी बदलामुळे दिलासा मिळेल, तसेच २ राशीच्या लोकांवर शनीची कृपादृष्टी होईल.

साडेसातीत वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल

शनीच्या साडेसातीला आणि राशी बदलाला लोक घाबरतात कारण यावेळी शनीची या लोकांवर बारीक नजर असते. तसेच शनीची साडेसाती आणि राशीबदलाचा प्रभाव व्यक्तीच्या आर्थिक, मानसिक आणि शारीरिक स्थितीवर वाईट परिणाम होतो.परंतु ज्या लोकांची कर्मे चांगली असतात आणि त्यांच्या कुंडलीत शनी शुभ स्थितीत असतो, त्यांना शनि सुद्धा शुभ फल देतो. तर, आपल्या कर्माबाबत जागरूक नसलेल्यांचा शनि जबरदस्त फटका देतो आणि कठोर शिक्षा देऊन त्यांना वठणीवर आणतो. 

या लोकांवर शनिचा कोप होतो हे लक्षात ठेवा : 

गरीब, असहाय महिला, बालक, मजूर, सफाई कर्मचाऱ्यांवर अत्याचार करणाऱ्या लोकांवर शनिचा कोप होतो. अशा लोकांची प्रगती आपल्याला दिसत असली तरी शनी देव त्यांना अशा अवघड जागेचे दुखणे देतात, की सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. त्यामुळे समाजातील कमकुवत, दुर्बल घटकांचे शोषण आणि अपमान टाळा. पशु-पक्ष्यांना त्रास देऊ नका. व्यसन करू नका, जुगार, सट्टा यांसारख्या वाईट सवयींपासून दूर राहा. खोटे बोलू नका, फसवू नका. ही खबरदारी न घेतल्यास शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागेल.

या लोकांनी सावध रहा: 

२९ एप्रिल रोजी शनीचे संक्रमण होताच मीन राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरू होईल. मकर, कुंभ आणि मिन राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव असणार आहे. तसेच मकर राशीतून कुंभ राशीत शनीचा प्रवेश होणार असल्यामुळे कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीची नजर असेल. त्यामुळे या पाच राशीच्या लोकांनी आपल्या कर्माबाबत अत्यंत सावध राहावे. त्याचप्रमाणे अन्य राशीच्या लोकांनीही प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत राहावे!

त्याचबरोबर हनुमंताची किंवा शनी देवाची उपासना सुरू ठेवावी. यथाशक्ती दान धर्म करावा. कोणालाही दुखवू नये. अपमान करू नये. शक्य तेवढी ज्येष्ठांची सेवा करावी. दुसऱ्यांना मदत करावी. शिस्तीने वागावे. अनैतिक कर्म करू नये. धार्मिक कार्यात सहभागी व्हावे. कर्तव्यात कसूर करू नये!