शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

Kushmanda Navami 2024: १० नोव्हेंबर रोजी कोहळ्याचे दान करा; विष्णूलक्ष्मीची कृपा मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:36 IST

Kushmada Navami 2024: कुष्मांड नवमी या तिथीचे महत्त्व आणि त्यादिवशी कोहळा दान केल्याने होणारे लाभ वाचून आश्चर्यचकित व्हाल!

कार्तिक शुक्ल नवमीला कुष्मांड (Kushmanda Navami 2024)नवमी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. तसेच या तिथीला कोहळ्याचे दान करण्याला महत्त्व आहे. १० नोव्हेंबर रोजी कुष्मांड नवमी आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया या व्रताविषयी! 

या दिवशी गाईच्या तुपात बुडवलेल्या कोहळ्याची प्रथम पूजा करावी. नंतर यथाशक्ती फळे, दक्षिणा, अन्न आणि मौल्यवान रत्नांसह तो दान द्यावा असा विधी सांगितलेला आहे. सद्यस्थितीत पंचरत्ने दान करणे शक्य नसले, तरी कोहळा दान करणे सहज शक्य आहे. तूपात बुडवून कोहळा देण्याऐवजी तूप आणि कोहळा असे दोन्ही जिन्नस वेगवेगळे देणे अधिक योग्य ठरेल. कोहळेपाक किंवा पेठासुद्धा भेट म्हणून देता येईल. हे दान देताना जो मंत्र म्हणतात, त्याचा अथर असा आहे, 'हे विष्णो, प्राचीन काळी ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेला आणि अनेक बियांनी युक्त असलेला कोहळा मी तुला अर्पण करत आहे.' या भावनेनेच हा कोहळा दान करावा.

या व्रताशी निगडित अशी कथा स्कंदपुराणात सांगितली आहे-

द्वापर युगात सर्वांना त्रस्त करणाऱ्या कुष्मांड दैत्याचा या कार्तिक नवमीला भगवान विष्णूंनी वध केला होता. त्यावेळी कुष्मांड दैत्याच्या शरीरातून अनेक वेली उत्पन्न झाल्या. त्यांना फळे लगडलेली होती. ते कोहळे होते. हे कोहळे भगवान विष्णूंना विशेषत्वाने प्रिय झाले. म्हणून या तिथीला भगवान विष्णूंची पूजा करावी मग कोहळ्याचे दान द्यावे.

कोहळ्याला सजीव प्राण्याच्या शिराचे प्रतीक मानतात त्यामुळे महाराष्ट्रात स्त्रिया कोहळा कापत वा चिरत नाहीत, तर पुरुषमंडळींकडून पहिला घाव घालून घेतात. यज्ञातही पशूबळीऐवजी कोहळ्याचा बळी दिला जातो. कोहळा हा पित्तशामक व बलवर्धक आहे. हे गुणधर्म लक्षात घेऊन त्याचे रक्षण आणि संवर्धन व्हावे, तसेच भोजनातही वापर व्हावा यादृष्टीने त्याचा समावेश या व्रतात केला गेला असावा. 

ज्यांना कोहळा दान करणे शक्य नाही त्यांनी कोहळ्यापासून बनवला जाणारा पेठा गोरगरिबाला दान करावा. त्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि विष्णु व लक्ष्मी कृपा प्राप्त करावी!

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२४