Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 17:14 IST2025-10-03T17:00:46+5:302025-10-03T17:14:24+5:30
Kojagiri Purnima 2025: 6 ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमा आहे, त्या रात्री चंद्रप्रकाशात न्हाऊन निघण्यासाठी एक तास शिल्लक ठेवा, कारण...

Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
पौर्णिमा ही चंद्र दर्शनाची पूर्ण तिथी, त्यातच कोजागरीची रात्र सर्वात महत्त्वाची. त्यादिवशी चंद्र दर्शन केवळ मसाले दूध पिण्यासाठी नाही, तर शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक लाभ मिळवण्यासाठी करायचे. यंदा सोमवार ६ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमा(Kojagiri Purnima 2025) आहे, त्यानिमित्ताने चंद्र दर्शनाचे महत्त्व जाणून घेऊ.
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
कोजागरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव! त्या दिवशी चंद्र स्वत:च्या सोळाही कलांनी फुललेला असतो. ज्योतिषशास्त्राच्यादृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ असतो. संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा मोठा वाटतो. चातुर्मासातील चार महिन्यात आकाश मेघांनी घेरलेले असते, त्यामुळे चंद्रदर्शन स्पष्ट होत नाही. त्यामुळेदेखील कोजागरी पौर्णिमेचा चंद्र अधिक आकर्षक वाटतो.
चंद्राजवळ सुंदरता व शीतलता यांचा समन्वय पहायला मिळतो. केवळ बाह्य सौंदर्य कित्येक वेळा मोहक, मादक व दाहकही बनते. परंतु त्यात जेव्हा आंतर सौंदर्य मिसळते त्यावेळी ते शीतल व शांतिदायक बनते. संतांजवळ चंद्राच्या शीतल चांदण्यासारखे सौंदर्य असते. आपल्या अगदी जवळचे अवतार राम व कृष्ण. यांच्याजवळही शांत व प्रसन्न सौंदर्य होते. म्हणूनच लोक त्यांना रामचंद्र, कृष्णचंद्र म्हणू लागले, असे सुंदर विवेचन प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले करतात.
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
गीतेत भगवंताने `नक्षत्राणामहं शशी' असे म्हणून चंद्राला स्वत:ची विभूती मानले आहे. सूर्याच्या तेजाकडे पाहणे कठीण आहे पण चंद्रासमोर तासनतास मांडी घालून बसू शकतो. चंद्र हा मनाचा देव आहे. संतप्त मनाचा माणूस पौर्णिमेच्या चांदण्यात फिरायला निघाला तर त्याला मानसिक शांततेचा अनुभव येतो.
चंद्राचा प्रकाश केवळ शांत व शीतल आहे एवढेच नाही, तर तो उपयोगी व उपकारकही आहे. शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधींच्या गुणांना पुष्ट करण्यात चंद्राचा फार मोठा भाग आहे. भगवान गीतेत सांगतात, `रसात्मक सोम बनून मी सर्व औषधींना पुष्ट करतो. पुष्णामि चौषधी: सर्वा: सोमो भूत्वा रसात्मक:!'
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
या दिवशी नवीन तयार झालेल्या धान्याचे पोहे दुधासोबत खावेत. चंद्र, चांदणे, दूध, पोहे, साखर सर्वच पांढरे आहेत म्हणून कोजागरी पौर्णिमा हा धवलरंगी उत्सव म्हणून गणला जातो. या दिवशी नाचायचे, बागडायचे, गायचे, रास गरबा खेळायचा पण या सर्व आनंदात उज्ज्वलता राखायची. विशुद्ध मनाचे आणि निर्मळ अंत:करणाने जो उत्सवाचा उल्ल्हास किंवा जिवनाचा आनंद मिळवू शकतो तो पूर्णत: प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा. असा संदेश देणारा शरदाचा चंद्र रात्रभर गगनात फिरत असतो. आपणही तो संदेश पाळला तर किती चांगले होईल...!